← मागील अभंग (96)
पुढील अभंग (98) →

अभंग क्रमांक: ९७


काही नित्सनेमाविण । अन्न खाय तोचि श्वान ।वाया मनुष्यपण । भार वाहे
तो वृषभ ।।
त्याचा होय भूमी भार । नेणे यातीचा आचार ।झाला दावेदार । भोगवी अघोर
पितरांसि ।।
अखंड अशुभ वाणी । खरे न बोलेचि स्वप्नी ।पापी तयाहुनी । आणिक नाही
दुसरा ।।
पोट पोसी एकला । भूती दया नाही ज्याला ।पाठी लागे आल्या । अतिथाचे
दाराशी ।।
नाही संतांचे पूजन । न घडे तीर्थांचे भ्रमण ।यमाचा आंदण । सीण थोर
पावेल ।।
तुका म्हणे त्यांनी । मनुष्यपणा केली हानी ।देवा विसरुनी । गेली म्हणता
मी माझे ।।

अर्थ:
अधर्म करू नये, त्याने अहितच साधले जाते, पाप पदरी येते, नरक जोडला जातो.. आणि देव अंतरतो ... Read More
← मागील अभंग (96)
पुढील अभंग (98) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!