तुकाराम महाराज वरील अभंगात देवाला उद्देशून म्हणतात की हे देवा नारायणा, हे विठ्ठला मला त्या व्यक्तीशी देखील काहीएक संबंध नको आहे ज्याच्या तोंडाला धीर नसतो आणि ज्याची बुद्धी देखील स्थिर नसते.
किंबहुना अशा माणसाचे मला कधीही कोणत्याही काळीदेखील चुकूनही दर्शन न होवो अशीच माझी इच्छा आहे.
ते म्हणतात एवढेच नव्हे तर अशा दुर्जनासोबत, किंबहुना अशा खळासोबत माझा केव्हा संबंध येईल वा कधी गाठभेट पडेल अथवा कोणत्या सणा-समारंभाला यांच्यासोबत उठबैस होईल वा एखाद्या पंगतीला बसावे लागेल असे देखील घडू देऊ नकोस.
कारण असे लोक इतरांशी वाद घालण्यात सराईत असून तशा संधीच्या ते नेहमी मागावरच असतात आणि अखेरीस शोधूनच काढतात.
आणि एवढेच नव्हे तर अशी लोकं देखील समाजातील चांगल्या लोकांची निंदा-नालस्ती करणारे असतात, त्यांना त्रास देणारे असतात व शक्य त्या मार्गाने त्यांना छळतात.
परंतु एरव्ही स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी मात्र अधम लोकांचे गोडवे गातात, त्यांना वंदन करतात. त्यांची पूजाच करतात.
त्यामुळे हे देवा अशा समाज कंटकांपासून देखील मला तू लांबच ठेवलेले बरे. ज्यांच्या पोटी एक भाव असतो आणि होटी मात्र नेहमी काही भलतेच असते.
कारण असे हे वाचाळवीर आणि ढोंगी माणसे निचाहून नीच असतात. स्वतःच्या लोभासाठी संतांची निंदा करण्यास देखील मागेपुढे पाहत नाहीत. परंतु तोच दुसरीकडे अधम लोकांचे तळवे चाटण्यास, त्यांचा उदो उद...
Read More
तुकाराम महाराज वरील अभंगात देवाला उद्देशून म्हणतात की हे देवा नारायणा, हे विठ्ठला मला त्या व्यक्तीशी देखील काहीएक संबंध नको आहे ज्याच्या तोंडाला धीर नसतो आणि ज्याची बुद्धी देखील स्थिर नसते.
किंबहुना अशा माणसाचे मला कधीही कोणत्याही काळीदेखील चुकूनही दर्शन न होवो अशीच माझी इच्छा आहे.
ते म्हणतात एवढेच नव्हे तर अशा दुर्जनासोबत, किंबहुना अशा खळासोबत माझा केव्हा संबंध येईल वा कधी गाठभेट पडेल अथवा कोणत्या सणा-समारंभाला यांच्यासोबत उठबैस होईल वा एखाद्या पंगतीला बसावे लागेल असे देखील घडू देऊ नकोस.
कारण असे लोक इतरांशी वाद घालण्यात सराईत असून तशा संधीच्या ते नेहमी मागावरच असतात आणि अखेरीस शोधूनच काढतात.
आणि एवढेच नव्हे तर अशी लोकं देखील समाजातील चांगल्या लोकांची निंदा-नालस्ती करणारे असतात, त्यांना त्रास देणारे असतात व शक्य त्या मार्गाने त्यांना छळतात.
परंतु एरव्ही स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी मात्र अधम लोकांचे गोडवे गातात, त्यांना वंदन करतात. त्यांची पूजाच करतात.
त्यामुळे हे देवा अशा समाज कंटकांपासून देखील मला तू लांबच ठेवलेले बरे. ज्यांच्या पोटी एक भाव असतो आणि होटी मात्र नेहमी काही भलतेच असते.
कारण असे हे वाचाळवीर आणि ढोंगी माणसे निचाहून नीच असतात. स्वतःच्या लोभासाठी संतांची निंदा करण्यास देखील मागेपुढे पाहत नाहीत. परंतु तोच दुसरीकडे अधम लोकांचे तळवे चाटण्यास, त्यांचा उदो उदो करण्यास ह्यांना जराही कमीपणा वाटत नाही. काडीचीही लाज वाटत नाही.
किंबहुना असे हे निर्लज्ज केव्हाही, कोणत्याही थराला जाऊ शकतात.
तुकोबाराय शेवटी म्हणतात त्यामुळे बहुधा आमच्या सारख्यानाच ह्यांचे अधिक भय वाटून आम्हीच यांना अधिक भितो.
अभंग ९४
Show Less
Comments
No comments yet. Be the first to comment!