दुर्जनाची गंधी विष्टेचीया परी । देखोनिया दुरी
व्हावे तया ।।
ऐका हो तुम्ही मात हे सज्जन । करू संघष्टन
नये बोलों ।।
दुर्जनाचे अंगी अखंड विटाळ । वाणी रजस्वला
स्त्रवे तैशी ।।
दुर्जनाचे भय धरावे त्यापरी । पिसाळलेवरी धावे
श्वान ।।
दुर्जनाचा भला नव्हे अंगसंग । बोलिलासे त्याग
देशाचा त्या ।।
तुका म्हणे किती सांगावे पृथक । अंग कुंभपाक
दुर्जनाचे ।।
Comments
No comments yet. Be the first to comment!