देखोनि पुराणिकांची दाढी । रडे स्फुंदे
नाक ओढी ।।
प्रेम खरें दिसे जना । भिन्न अंतरीं
भावना ।।
आवरितां नावरे । खुर आठवी
नेवरे ।।
बोलों नयें मुखावाटां । म्हणे होतां
ब्यांचा तोटा ।।
दोन्ही सिंगें चारी पाय । खुणा दावी
म्हणे होय ।।
मना आणितां बोकड । मेला त्याची
चरफड ।।
होता भाव पोटीं । मुखा आलासे
शेवटीं ।।
तुका म्हणे कुडें । कळों येतें
तें रोकडें ।।
भक्ती कशी करू नये?, भाव नसताना खऱ्या भावाचा आव आणू नये...
Comments
No comments yet. Be the first to comment!