← मागील अभंग (8)
पुढील अभंग (10) →

ह्या जगी खरे भाग्यवंत कोण आहे?

Published on: 15 Sep 2025, 03:34 PM

परिस्थिती / संदर्भ:

जे स्वहितासाठी सदैव जागरूक असतात, त्यासाठी झटतात व प्रयत्न घेतात.

पहा पुढील अभंगात तुकोबा काय म्हणतात ते...
Get Started

अभंग क्रमांक: ९


आपुलिया हिता जो होय जागता । धन्य मातापिता
तयाचिया ।।
कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक । तयाचा हरिख
वाटे देवा ।।
गीता भागवत करिती श्रवण । अखंड चिंतन
विठोबाचे ।।
तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा । तरी माझ्या दैवा
पार नाही ।।

अर्थ:
तुकाराम महाराज म्हणतात ह्या संसारात येऊन जे लोकं स्वतःच्या खऱ्या हिताप्रति सदैव जागृत असतात, त्यासाठी रोकडे प्रयत्न घेतात आणि झटतात, त्यांचे माता-पिता खऱ्या अर्थाने धन्य असून भाग्यवंत देखील असतात असे समजावे.
ते म्हणतात तसेच ज्या कुळात सात्विक कन्या-पुत्र जन्म घेतात, जी सत्व गुणांनी भरलेली असून ज्यांचा भाव व स्वभाव शुद्ध असतो, जे नेहमी सत्याने आचरण आणि वर्तन करतात, अशा सात्विक लोकांचीच देवाला अत्यंत आवडी असते आणि अशांच्या दर्शनाची त्याला देखील सतत ओढ लागून असते.
त्याला देखील अशीच माणसे प्रिय असून त्यांच्या या भूतलावर असण्याने त्यास अतीव आनंद होत असतो. समाधान लाभत असते. एवढेच नव्हे तर त्यांच्या भेटीची तो देखील वाट पाहत असतो.
तसेच ज्या घरातील माणसे गीता, भागवत यांची पारायणे करतात, अन्य कथा-पुराणांचे कथन-श्रवण करतात, हरि-कीर्तनाला हजेरी लावतात आणि वर विठोबाचे अखंड स्मरण करतात, तुकोबा म्हणतात, आम्हा विष्णुदासांना देखील अशीच माणसे आवडतात. या जगी असलेल्या अशाच श्रद्धाळु लोकांची आम्हास देखील आवडी असून त्यांच्याप्रती नित्य एक आदर आणि ओढ असते.
ते शेवटी म्हणतात अशा लोकांच्या सानिध्यात राहण्याची आम्हास जर केव्हा संधि मिळाली वा सेवा करण्याचे भाग्य लाभले तर आमच्या आनंदाला काही पारच उरणार नाही. काही पारावारच राहणार नाही.
हेच नव्हे तर, आमचे देखील खऱ्या अर्थाने भाग्य उजळले वा आमच्या सारखा... Read More
← मागील अभंग (8)
पुढील अभंग (10) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments
Sandip prakash patil Patil (2025-09-17 04:44:21)

अतिशय चांगला उपक्रम माऊली.. आम्हाला या उपक्रमात सहभागी करून घेतल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद व आभार राम कृष्ण हरी..

भगवान शंकर देवकर (2025-09-16 19:47:17)

जय हो राम कृष्ण हरी