← मागील अभंग (7)
पुढील अभंग (9) →

स्वतःची पूर्वीची अवस्था कथन करताना...

Published on: 12 Sep 2025, 08:04 AM

परिस्थिती / संदर्भ:

पहा मी कसा आणि केव्हा भानावर आलो ते..

पहा पुढील अभंगात तुकोबा काय म्हणतात ते...
Get Started

अभंग क्रमांक: ८


सावध झालो सावध झालो । हरीच्या आलो
जागरणा ।।
पळोनिया गेली झोप । होते पाप
आड ते ।।
तेथे वैष्णवांचे भार । जयजयकार
गर्जतसे ।।
तुका म्हणे तया ठाया । ओळे छाया
कृपेची ।।

अर्थ:
तुकाराम महाराज म्हणतात मी देखील पूर्वी तुम्हा लोकांसारखाच या संसारात आकंठ बुडालो होतो. आणि या सांसाररूपी मृगजळाशी एकरूप झालो होतो. त्याची दिनरात सेवा करत होतो. किंबहुना तसे करण्यात धन्यताच मानत होतो.
परंतु मी हरिच्या जागरणाला, त्यांच्या कीर्तनाला काय जायला लागलो, माझी झोपच उडाली. माझे डोळेच उघडले. आणि कधी नव्हे ते मी भानावर आलो. किंबहुना माझी झोपच पळून गेली.
ते म्हणतात अशा या कीर्तनाच्या ठिकाणी वैष्णवांचे लोंढेच्या लोंढेच लोटलेले असतात, त्यांची तेथे मंदियाळीच असते. किंबहुना त्यांची तेथील उपस्थिती पाहून जणूकाही त्या जागेला त्यांचा भारच होत असावा अथवा वाटत असेल असे वाटावे. असो.
परंतु त्यांच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या विठ्ठल नामाच्या अखंड जल्लोषाने, त्याच्या जयजयकाराने, किंबहुना त्या गर्जनेने कित्येक जन्म झोपी गेलेला मनुष्य सहज आणि लागलीच भानावर येतो, तात्काळ त्याची दृष्टी उघडून तो खडबडून जागाच होतो.
त्यामुळे मला देखील तशी खडबडून जाग आली नसती तरच नवल ठरले असते आणि मी देखील भ्रमातून भानावर आलो नसतो तर आश्चर्यकारक गोष्ट घडली असे म्हणावे लागले असते. असो.
तेव्हा अशा ठिकाणी मी उपस्थिती काय लावू लागलो वा हजेरी लावण्यास सुरुवात काय केली मला लागलीच कळून चुकले की आजवर मी खऱ्या अर्थाने झोपलो होतो, संसाररूपी मृगजळात अडकलो होतो आणि अशा या झोपेच्या आड माझ्या कडून दैनंदिन पातळीवर पापच घडत... Read More
← मागील अभंग (7)
पुढील अभंग (9) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!