← मागील अभंग (6)
पुढील अभंग (8) →

स्वहित कसे साधावे?

Published on: 09 Sep 2025, 05:43 AM

परिस्थिती / संदर्भ:

या अभंगात तुकोबा आपल्या मनाला देखील तेच सांगत आहेत. म्हणजेच ज्ञान-उपरती नंतर पुढील हितासाठी, उद्धारासाठी व देवाप्रति भाव बळकट करून भक्तीस प्रारंभ करण्यासाठी तुकोबा आपल्या मनाला देखील तेच आवाहन करत आहेत.

पहा पुढील अभंगात तुकोबा काय म्हणतात ते...
Get Started

अभंग क्रमांक: ७


नये जरी तुज मधुर उत्तर । दिधला सुस्वर
नाही देवे ।।
नाही तयावीण भुकेला विठ्ठल । येईल तैसा बोल
रामकृष्णा ।।
देवापाशी मागे आवडीची भक्ती । विश्वासेंशी प्रीती
भावबळे ।।
तुका म्हणे मना सांगतो विचार । धरावा निर्धार
दिसेंदिस ।।

अर्थ:
तुकाराम महाराज म्हणतात की हे माझ्या मना, हे माझ्या जिवा, आता आपल्याला भक्तिपंथाचा अवलंब करायचा आहे. आणि त्यासाठी मला तुझ्याकडून संपूर्ण साथीची अपेक्षा आहे. किंबहुना मला तुझी पूर्णच साथ हवी आहे.
त्यामुळे देवासाठी भक्तिगीते गाताना, त्याची स्तुति करताना तू मला, काकू न करता व कोणतेही कारण पुढे न करता, साथ द्यावीस अशी मी तुला विनवणी करत आहे.
म्हणजेच काय तर, तुझ्याकडे गोड गळा नसला तरीही चालेल अथवा तुला देवाने सुस्वर दिला नसेल तरीही काही हरकत नाही.
परंतु तू देवाचे नाम घेण्यास आता सुरुवात कर आणि तुला जमेल तसे रामकृष्णहरी म्हणावयास प्रारंभ कर. आणि देवापाशी त्याच्या आवडीची भक्ति मागून घे.
कारण देव मुळात त्यासाठी भुकेलेला नाही व नसतो. किंबहुना त्याला त्याची किंचितही चाड नसते.
किंबहुना एका भावापलीकडे त्यास काहीही नको असते. आणि इतर मायिक पदार्थ तर त्यास रुचत देखील नाहीत.
त्यामुळे तू केवळ तुला येईल तसे रामकृष्णहरि बोल. आणि त्यासोबत देवाला देखील आवडेल, रुचेल व आनंद देऊन जाईल अशी भक्ति त्याच्याकडूनच मागून घे. जेणेकरून देवाला तुझ्यावरील आणि तुझा देवावरील विश्वास दृढ होत जाईल.
कारण दोन जीवांचा एकमेकांवरील विश्वास जेव्हा दृढ होतो तेव्हाच दोघांमधील अंतर कमी होऊन एकमेकांप्रति असलेली प्रीती दुणावत जाते आणि त्याद्वारे दोघांमधील भाव देखील बळकट होण्यास मग मदत होते.
त्यामुळे हे माझ्या सख्या... Read More
← मागील अभंग (6)
पुढील अभंग (8) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!