तुकाराम महाराज म्हणतात हे देवा विठ्ठला, हे नारायणा तुझे गरुडावर विराजमान झालेले स्वरूप देखील मला पहायचे आहे. तू ज्या ऐटीत गरुडावर बसलेला आहेस आणि तुझ्या कासेला पितांबर नेसवलेले आहे (म्हणजेच कमरेला पीतांबर लावलेले) असे ते तुझे ऐटीतले रूप देखील मला अतिशय भावते. तुझे हे दिमाखदार रूप पाहण्याची माझ्या डोळ्यांना इच्छा होत आहे, तेव्हा असे हे तुझे सावळे मनोहर असलेले रूप माझ्या डोळ्यांना केव्हा दिसेल? मला केव्हा पाहता येईल?
ते पुढे म्हणतात तुला ठाऊक नाही जेव्हा आकाशात काळे ढग दाटून येतात, तेव्हा त्यांचा रंग घनघोर निळा-सावळा असतो, आणि त्याच रंगात जेव्हा तू देखील अवतोरतोस अथवा न्हाऊन निघतोस, ते तुझे रूप देखील माझ्या मनाला अतिशय प्रिय असून तुझा तो सावळा रंग देखील मला अतिशय आवडतो. ते तुझे रूप देखील माझ्या मनाला वेड लावते.
एवढेच नव्हे तर असे हे मेघांच्या रंगाचे सावळे, मनोहर रूप तू जेव्हा धारण करतोस, तेव्हा तुझ्या गळ्यात रुळत असलेली वैजयंती माळ मग अधिकच खुलून दिसू लागते आणि तुला देखील मग ती अधिकच शोभून दिसू लागते. किंबहुना तुझ्या गळ्याची ती मग शोभाच वाढवत नेते.
तुझे हे रूप देखील माझ्या अत्यंत आवडीचे असून ते देखील मला पहायचे आहे. अशा या तुझ्या सुंदर रुपाचे देखील हे श्रीहरि मला दर्शन घ्यायचे आहे.
एवढेच नव्हे तर तुझी इतर रुपे देखील मला अतिशय भुलवतात. माझ्या मनाला भुरळच घालतात.
जेव्हा तुझ्या...
Read More

जेव्हा तुझ्या मस्तकावर असलेल्या मुगुटाचे तेज कोटी सूर्य प्रगटल्याप्रमाणे फाकते तेव्हा तुझ्या कंठी असलेला निर्मळ कौस्तुभ मणी मग अतिशय प्रज्वलित होतो व जीवंत असल्यासारख्याच भासू लागतो. तुझे ते रूप देखील अतिशय विलक्षण असून ते देखील पाहण्याची माझ्या मनाची तीव्र इच्छा आहे. किंबहुना तुझी सर्वच रुपे मला अत्यंत प्रिय आहेत.
किंबहुना तुझे श्रीमुखच हे खऱ्या अर्थाने सुखाचे आगर असून डावीकडे उभी असलेली रखुमाई, म्हणजेच वामांगी उभी असलेली तुझी वेल्हाळ अशी अर्धांगिनी आणि तुम्हा जोडीच्या दोन्ही बाजूला उभे असलेले उद्धव-अक्रूर, ते तुझे रूप देखील काही औरच असून सनकादिक ऋषी तुझ्या ह्या रुपाची तर अखंड पवाडेच गात असतात.
तुझे ते देखील रूप पाहण्याची माझ्या डोळ्यांना भूक लागली असून मला तुझी ही सर्वच रुपे पाहण्याची आता तीव्र ओढ लागत चालली आहे.
ते देवाला विचारतात असा हा नानाविध छटांनी नटलेला श्रीहरी-नारायण मला केव्हा आणि कसा भेटेल आणि मला कधी गळाभेटी देईल याची मी आतुरतेने वाट पाहत आहे. कारण तुझी ही सर्व रुपे मला माझ्या डोळ्यांत भरून घ्यायची आहेत. हृदयात साठवून ठेवायची आहेत.
तुकोबाराय शेवटी जगालाच ओरडून सांगतात की असा हा विठुराया जो या विश्वात इतर कोणाही सारिखा नाही, तोच माझा जीवच्श्च-कंठच्श्च आहे. तोच माझा जिवलग असून तोच माझा सखा पांडुरंग आहे.
अभंग ६
Show Less
Comments
No comments yet. Be the first to comment!