तुकाराम महाराज देवाला म्हणतात हे देवा विठ्ठला, हे नारायणा तुझे हे साजिरे-गोजिरे रूप पाहून माझ्या मनी तुझ्या दर्शनाची आता ओढ निर्माण झाली आहे. तुझ्या भेटीची माझ्या मनात आस निर्माण होत आहे. तेव्हा मला तुझी ही नानाविध रुपे केव्हा दाखवशील? माझ्या डोळ्यांना ती केव्हा पाहावयास मिळतील?
ते म्हणतात गळ्यात तुळशीच्या माळा घालून कमरेवर हात ठेवून उभे असलेले तुझे ते रूप एकदातरी माझ्या डोळ्यांना दाखव. तसेच तुझे दोन्ही चरण विटेवर समप्रमाणात ठेवून उभे असलेले रूप देखील मला पाहावयाचे असून ते देखील तू मला दाखवावेस अशी माझी इच्छा आहे.
तसेच तुझ्या कटीला म्हणजेच कंबरेला पितांबर नेसून कास मिरवणारे तुझे रूप देखील मला पहायचे आहे. तेव्हा अशा मूर्ती स्वरूपात असेलेल तुझे रूप देखील तू मला दाखव अशी माझी तुझ्याकडे मागणी आहे.
तसेच ते पुढे म्हणतात गरुड पारावर उभे असलेले देखील तुझे रूप मला पहायचे आहे. ते देखील तू मला दाखव. कारण ते नित्यनित्य माझ्या मनी, माझ्या स्वप्नी येऊन मला खुणावत असते. माझ्या मनाला भुरळ घालत असते. सदैव माझ्या डोळ्यांपुढे नाचत असते. त्यामुळे राहून राहून मला तेच आठवत राहते, आणि माझ्या जीवाला झुरवत राहते. एवढेच नव्हे तर माझ्या मनी तुझ्या भेटीची इच्छा तीव्र करत नेते.
ते पुढे म्हणतात अशी ही तुझी विविधारंगी रुपे पाहण्यास माझा जीव झुरू लागला आहे. किंबहुना ती पाहण्यासाठी तो वरखाली होत आहे.
आणि ...
Read More

आणि आता माझे मन तर तुझी रूप पाहण्यास एवढे झुरू लागले आहे की ते आता झुरून पूर्ण पांजरा होऊ पाहत आहे. तेव्हा तू आता मला तातडीने भेटावयास यावेस आणि माझ्या इच्छांची पूर्तता करावीस अशी मी तुला कळकळीची विनंतीच करतो आहे.
तेव्हा हे पंढरीनाथा, हे श्रीहरी आता कृपा करून माझी विनंती अव्हेरून लावू नयेस. त्याप्रति उदासीन राहू नयेस. किंबहुना माझ्या विनंतीचा मान राखून जितक्या शक्य तितक्या लवकर तू माझी आस पूर्ण करावीस अशी मी तुला आता पुन्हा एकवार विनवणी करत आहे.
अभंग ५
Show Less
Comments
No comments yet. Be the first to comment!