तुकोबा पुढे म्हणतात म्हणतात हे देवा पांडुरंगा, हे विठ्ठला तुझे रूप, तुझे सौंदर्य म्हणजे जणूकाही एक मदनाचा पुतळाच असून एखाद्या सुकुमार राजासारखाच ते आहे. अशा या तुझ्या मोहक रूपापुढे रवि-शशी देखील लोप पावले असून त्यांचे सौंदर्य देखील पूर्णपणे हारपत चालले आहे.
ते म्हणतात तुझी सुंदर अशी मळवट कस्तुरीने भरलेली असून तुझ्या सर्वांगाला चंदनाच्या उटीचा लेप लावलेला आहे आणि गळ्यात सुंदर अशी वैजयंती माळ अतिशय प्रेमाने रुळते आहे. आणि तुझ्या डोईवर असलेल्या मुगुटाने आणि कानी असलेल्या कुंडलांनी आधीच लोभस असेलल्या तुझ्या श्रीमुखास अधिकच शोभा मिळवून दिली आहे. त्यांच्यामुळे तुझे श्रीमुख अतिशयच प्रतिभावान वाटत आहे.
किंबहुना या सर्वामुळे तुझे श्रीमुख एवढे शोभून दिसत आहे की जणूकाही ते सुखाचेच ओतले आहे, म्हणजेच सुखाने काठोकाठ भरलेले आहे असेच वाटावे.
तसेच कासेला लावलेली सोनेरी सळा आणि त्यावर पांघरलेले पाटोळे यांमुळे तुला अधिकच रुपवंत बनवत आहे. शोभिवंत केले आहे. आणि येथे जमलेल्या बहुतेकांच्या मनाचा ते ठाव घेत आहे.
आणि मला विचारशील तर माझी अवस्था त्याहूनही बिकट होत चालली आहे. कारण असे हे तुझे लाघवी, घननीळे आणि सावळे रूप माझ्या मनाला एवढे भूल घालत आहे की ते क्षणाक्षणाला अधिकच तुझ्या मोहात पाडत आहे. आणि तुझ्या प्रेमात पाडण्यास अक्षरशः विवश करत आहे. आणि त्यास आवर घालणे माझ्यासाठी आता अवघड होत चालले आह...
Read More
तुकोबा पुढे म्हणतात म्हणतात हे देवा पांडुरंगा, हे विठ्ठला तुझे रूप, तुझे सौंदर्य म्हणजे जणूकाही एक मदनाचा पुतळाच असून एखाद्या सुकुमार राजासारखाच ते आहे. अशा या तुझ्या मोहक रूपापुढे रवि-शशी देखील लोप पावले असून त्यांचे सौंदर्य देखील पूर्णपणे हारपत चालले आहे.
ते म्हणतात तुझी सुंदर अशी मळवट कस्तुरीने भरलेली असून तुझ्या सर्वांगाला चंदनाच्या उटीचा लेप लावलेला आहे आणि गळ्यात सुंदर अशी वैजयंती माळ अतिशय प्रेमाने रुळते आहे. आणि तुझ्या डोईवर असलेल्या मुगुटाने आणि कानी असलेल्या कुंडलांनी आधीच लोभस असेलल्या तुझ्या श्रीमुखास अधिकच शोभा मिळवून दिली आहे. त्यांच्यामुळे तुझे श्रीमुख अतिशयच प्रतिभावान वाटत आहे.
किंबहुना या सर्वामुळे तुझे श्रीमुख एवढे शोभून दिसत आहे की जणूकाही ते सुखाचेच ओतले आहे, म्हणजेच सुखाने काठोकाठ भरलेले आहे असेच वाटावे.
तसेच कासेला लावलेली सोनेरी सळा आणि त्यावर पांघरलेले पाटोळे यांमुळे तुला अधिकच रुपवंत बनवत आहे. शोभिवंत केले आहे. आणि येथे जमलेल्या बहुतेकांच्या मनाचा ते ठाव घेत आहे.
आणि मला विचारशील तर माझी अवस्था त्याहूनही बिकट होत चालली आहे. कारण असे हे तुझे लाघवी, घननीळे आणि सावळे रूप माझ्या मनाला एवढे भूल घालत आहे की ते क्षणाक्षणाला अधिकच तुझ्या मोहात पाडत आहे. आणि तुझ्या प्रेमात पाडण्यास अक्षरशः विवश करत आहे. आणि त्यास आवर घालणे माझ्यासाठी आता अवघड होत चालले आहे.
तितक्यातच तेथे जमलेल्या बायांना देखील ते म्हणतात की तुम्ही देखील सर्वजणी आता याचक्षणी या एकासवे व्हा. एकही कक्ष न दवडता त्याला चहुबाजूने वेढा आणि ही आयती चालून आलेली संधी सोडू नका. कारण तुमच्यावर देखील ही पाळी लवकरच येणार आहे.
ते म्हणतात कारण जे रूप माझ्यासारख्या पुरुषाला देखील जर एवढे मोहक वाटू शकते आणि त्याच्या मोहात पाडू शकते आणि मनाला अधीर करू शकते तर तेथे तुमच्या बायकांची काय ती गत. तुम्ही देखील यापासून अधिककाळ वाचू शकत नाही.
अभंग ४
Show Less
Comments
No comments yet. Be the first to comment!