ते म्हणतात हे रखुमाईच्या पती, हे सोयरिया, आता माझे डोळे सदा तुझ्या मूर्तीवरच खिळून राहो, त्यांत सदैव तुझेच रूप जडो व नित्य-नित्य तेच यापुढे माझ्या डोळ्यात साचून राहो.
म्हणजेच यापुढे माझ्या हृदयात आता तूच एक संचारून रहा. माझ्या हृदय-पेटीत यापुढे तूच एक भरून रहा आणि माझी दृष्टीदेखील एक तुझ्या रुपावरच खिळून राहो आणि माझे ध्यान देखील तुझ्या मूर्तीवरच जडून राहो. किंबहुना तू मला आता असा वरच दे.
कारण तुझे रूप, तुझे नाम किंबहुना तुझे सर्वकाहीच एवढे गोड आणि लाघवी आहे की तेच मला सर्वकाळ प्रेम देते, सदैव माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करते आहे असेच मला सतत वाटत राहते.
हेच नव्हे तर तुझ्या नामाच्या उच्चाराने (कोण जाणे कसे काय ते) मी आपोआपच सुखावतो. मला एक आगळी-वेगळीच अनुभूति येते आणि एवढेच नव्हे तर मला आपोआपच अंतर्बाह्य प्रेमाची प्रचिती येते. आपण सदासर्वकाळ प्रेमातच न्हाऊन निघत आहोत असेच मला वाटत राहते.
थोडक्यात काय तर मला तुझ्या या प्रेमपाशात कायमचा जखडून ठेव आणि ह्यापल्याड मला आता अन्य काहीही नको. किंबहुना ह्यापलिकडे माझे तुझ्याकडे काहीही मागणे नाही.
कारण हे आई, हे विठुमाऊली तुझ्यापायीच माझे सर्व सुख दडलेले असून तेथेच मला आता सर्वसुखाचा ठेवा सापडला आहे आणि तेथेच मला खरे खरेखुरे समाधान देखील लाभते. किंबहुना ह्याची मला आता वारंवार प्रचितीच येऊ लागली आहे. ...
Read More
ते म्हणतात हे रखुमाईच्या पती, हे सोयरिया, आता माझे डोळे सदा तुझ्या मूर्तीवरच खिळून राहो, त्यांत सदैव तुझेच रूप जडो व नित्य-नित्य तेच यापुढे माझ्या डोळ्यात साचून राहो.
म्हणजेच यापुढे माझ्या हृदयात आता तूच एक संचारून रहा. माझ्या हृदय-पेटीत यापुढे तूच एक भरून रहा आणि माझी दृष्टीदेखील एक तुझ्या रुपावरच खिळून राहो आणि माझे ध्यान देखील तुझ्या मूर्तीवरच जडून राहो. किंबहुना तू मला आता असा वरच दे.
कारण तुझे रूप, तुझे नाम किंबहुना तुझे सर्वकाहीच एवढे गोड आणि लाघवी आहे की तेच मला सर्वकाळ प्रेम देते, सदैव माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करते आहे असेच मला सतत वाटत राहते.
हेच नव्हे तर तुझ्या नामाच्या उच्चाराने (कोण जाणे कसे काय ते) मी आपोआपच सुखावतो. मला एक आगळी-वेगळीच अनुभूति येते आणि एवढेच नव्हे तर मला आपोआपच अंतर्बाह्य प्रेमाची प्रचिती येते. आपण सदासर्वकाळ प्रेमातच न्हाऊन निघत आहोत असेच मला वाटत राहते.
थोडक्यात काय तर मला तुझ्या या प्रेमपाशात कायमचा जखडून ठेव आणि ह्यापल्याड मला आता अन्य काहीही नको. किंबहुना ह्यापलिकडे माझे तुझ्याकडे काहीही मागणे नाही.
कारण हे आई, हे विठुमाऊली तुझ्यापायीच माझे सर्व सुख दडलेले असून तेथेच मला आता सर्वसुखाचा ठेवा सापडला आहे आणि तेथेच मला खरे खरेखुरे समाधान देखील लाभते. किंबहुना ह्याची मला आता वारंवार प्रचितीच येऊ लागली आहे.
Show Less
Comments
No comments yet. Be the first to comment!