तुकोबा म्हणतात हे देवा पांडुरंगा, हे नारायणा तुझे विटेवर असलेले समचरण अतिशय साजिरे-गोजिरे असून ते नित्य त्या विटेची शोभा वाढवत आहेत, नव्हे ती वृद्धिंगतच करत आहे, तेव्हा अशा ह्या सुंदर ठिकाणीच यापुढे माझ्या इंद्रियांच्या सर्व वृत्ती सदैव एकवटून राहोत. आणि ह्याव्यतिरिक्त हे देवा माझे तुझ्याकडे अन्य काहीही मागणे नाही.
कारण यापुढे मला इतर कोणत्याही सांसारिक गोष्टीत अथवा मायिक पदार्थात रस उरलेला नाही, त्यामुळे तेथे आता हे देवा माझे आर्त वृद्धिंगत होईल असे होऊ देऊ नकोस.
कारण लौकिक गोष्टींमुळे केवळ आणि केवळ दुःखच पदरी येते हे मला आता चांगलेच उमगले असून अशा ह्या लौकिक गोष्टींपासून तू मला आता लांबच ठेव. हवे तर माझे तुझ्याकडे हे प्रामाणिक मागणेच आहे असे समज.
म्हणजेच काय तर लौकिक गोष्टी मनुष्याच्या दुःखालाच कारणीभूत ठरतात हे सत्य तुझ्या कृपेनेच मला ठाऊक झाल्यामुळे यापुढे त्यापासून तू माझे संपूर्ण संरक्षणच कर असे माझे तुला सांगणे आहे. किंबहुना अशी माझी तुला कळकळीची विनंतीच आहे.
एवढेच नव्हे तर येथील ब्रह्मादीक पदे देखील खऱ्या अर्थाने दुःखाची शिराणीच आहेत व असतात आणि मनुष्याच्या ऱ्हासालाच अधिक कारणीभूत ठरतात. वा त्यास अधिकच हातभार लावतात हे सत्यदेखील मला तुझ्या कृपेनेच कळून चुकले आहे. त्यामुळे अशा गोष्टींपासून देखील तू माझे रक्षण कर.
त्याप्रमाणेच अखंड नामस्मरण केल्याने व त्याद्वारे तुझी स...
Read More

त्याप्रमाणेच अखंड नामस्मरण केल्याने व त्याद्वारे तुझी सेवा घडल्याने माझ्याठायी पुण्याचा संचय होईल व त्याबदल्यात तू मला रिद्धीसिद्धी देऊ करशील, तर हे देवा तसे देखील तू काही घडू देऊ नकोस.
म्हणजेच काय तर माझी भक्ती पाहून, माझी सेवा पाहून तू माझ्यावर अधिक प्रसन्न होशील आणि देहत्यागानंतर त्यामोबदल्यात मला अशी ही ब्रम्हपदे वा रिद्धीसिद्धी वैगेरे देऊ करशील वा स्वर्गाचा अधिपति करू पाहशील.
आणि त्याद्वारे नको त्या फंदात पाडू पाहशील. परंतु हे देवा मी तुला विनवणी करतो की तसे देखील तू काही घडू देऊ नकोस.
कारण अशा ह्या गोष्टी देखील मनुष्याच्या थेट अहंकारालाच हात घालतात व त्यास पुनः एकवार मोठेपणाच्या, श्रेष्ठत्वाच्या जाळ्यात अडकवतात आणि पुन्हा या इहलोकाशी जोडतात.
आणि विशेष म्हणजे मनुष्याचे मन देखील एवढे विचित्र असते की सर्वकाही ठाऊक असूनही ते पुनः मायेत अडकते आणि झणीच त्याच्यावर जडते. त्यामुळे अशा गोष्टींपासून देखील तू यापुढे मला कोसो दूर ठेव, हेच माझे तुझ्याकडे शेवटपर्यंत मागणे राहील.
परंतु मला एव्हाना हे देखील चांगलेच ठाऊक झाले आहे की असे करण्यात तुला मात्र अतिशय आनंद होतो व त्या निमित्ताने तू पुन्हा एकवार आम्हा भक्तांची कसोटी घेऊ पाहतोस आणि या मायाजालात पुन्हा एकवार गुंतवू पाहतोस.
एवढेच नव्हे तर भक्तांना नको त्या फंदी अडकवून आवडीने त्याची मजा घेणे व त्याचा आनंद लुटणे हे तुझे नित्याचे प्रकार आहेत व ते तू अतिशय आवडीने व कौतुकाने करतोस हे देखील आम्हास आता ठाऊक झाले आहे. परंतु आमची मात्र त्याने हानी होते.
त्यामुळे स्वतःचे मन रमवण्यासाठी तू माझ्या बाबतीत असे जर काही करू पाहशील किंवा करण्याचा घाट घालशील, तर खबरदार.
कारण अशाने तुझी मात्र चैन होते. मनोरंजन होते. परंतु आम्हा भक्तांचे मात्र त्याने अतोनात नुकसान होते.
कारण आम्हास पुनरूपी या संसाराची गोडी लागते व आमचे पाय पुन्हा एकवार त्यात अडकून पडतात व त्यातून बाहेर पडण्यास आम्हास पुनः तेवढाच विलंब लागून तेवढेच प्रयत्न व कष्ट घ्यावे लागतात.
कारण एकदा का ह्या गोष्टी लाभल्या की चित्त त्यावरच अडकून राहते, ज्यामुळे मग त्यास स्वहिताचा मार्ग पुनरूपी धूसर होऊन दिसेनासाच होतो. त्यामुळे हे देवा कृपया करून या सर्वांपासून तू आता मला लांबच ठेव.
कारण हे देवा पांडुरंगा, हे श्रीरंगा तुझ्या कृपेनेच तर मला ह्या सर्व गोष्टींतील वर्म आणि सार एकदाचे कळून चुकले आहे, आणि ते म्हणजे ह्या संसारातील सर्वच गोष्टी नाशिवंत असून क्षणभंगुर देखील असतात, त्यामुळे त्या टिकवण्यासाठी मनुष्याने घेतलेले सर्व प्रयत्न देखील अंती फोलच ठरतात.
एवढेच नहे तर त्यासाठी त्याने वेचलेले सर्व कर्मधर्म देखील अंती वाया जाऊन ते देखील सर्व नश्वरच असतात.
ज्यामुळे एका नैराश्यावाचून त्याच्या हाती अंती काहीही लागत नाही. त्यामुळे हे देवा नारायणा ह्या सर्वच गोष्टींपासून तू यापुढे माझे संरक्षणच कर असे माझे तुझ्याकडे मागणेच आहे, नव्हे, असे मी तुला साकडेच घालतो. किंबहुना असे मी तुला आता गाऱ्हाणेच घालतो आहे असे समज.
Show Less
Comments
No comments yet. Be the first to comment!