तुकोबा म्हणतात श्रीहरिचे विटेवरील कटीवर हात ठेवून उभे असलेले रूप मला अतिशय आवडते. अशा या रूपाला ध्यानाचे रुपक लावून ते म्हणतात असे हे कटीवर हात ठेवून उभे असलेले श्रीहरिचे सुंदर ध्यान आता माझ्या आवडीचे झाले असून त्याच्या गळ्यात तुळशीहार आहे आणि कासेला पितांबर नेसवलेले आहे व कानात सुंदर अशी मकर कुंडले तळपत असून कंठी असलेला कौस्तुभ मणी तेथे अतिशय मानाने व डौलात विराजमान झाला आहे.
ते पुढे नारायणालाच उद्देशून म्हणतात आता हे देवा, हे विठ्ठला, तुझे हे रूप माझ्या मनाला एवढे भावते की ते मला अत्यंत प्रिय झाले आहे.
किंबहुना तो माझ्यासाठी एक जिव्हाळ्याचाच विषय झालेला असून ते नित्य नित्य पाहणे ही माझ्यासाठी एक सुखाची पर्वणीच झाली आहे.
किंबहुना तो माझ्यासाठी एक सुखसोहळाच झाला असून माझ्यासाठी ते एक निरंतर सुखाचे साधनच झाले आहे आणि एवढेच नव्हे तर ते माझे सर्वसुख देखील असून ते आता मी अतिशय आवडीने पाहतो. किंबहुना असे हे तुझे श्रीमुख पाहण्यात मला कमालीची धन्यताच वाटत आहे.
अभंग १ ...
Read More

अभंग १
Show Less
Comments
अभंग
Very nice!