तुकाराम महाराज म्हणतात देव भक्ताच्या मनातील, त्याच्या अंतकरणातील आपल्या विषयी किती प्रेम आहे अथवा किती प्रेमभाव व गोडवा आहे तेवढेच पाहतो आणि तेवढेच घेतो.
एवढेच नव्हे तर त्याच्या अंतकरणातील आपल्याप्रति असलेला भाव किती शुद्ध आहे किती खरा आहे हे देखील पाहतो.
त्यात स्वार्थ तर दडलेला नाही ना अथवा कपट तर लपलेले नाही ना हे देखील बघतो आणि एकदा का तसे त्यास दिसून आले की मग तोच त्याचा भक्त होतो, त्याचा सोयरा होतो.
तुकोबा पुढे म्हणतात असा हा देव, म्हणजेच असा हा श्रीहरि येथील साध्या-भोळ्या भक्तांचा, अशा या दीनांचा सोयराच असतो. सखाच असतो.
कारण ज्यांचा भाव येथे शुद्ध झालेला असतो, भोळाभाबडा झालेला असतो, त्यांचे अंतकरण हे नेहमी प्रेमाने आणि दया-क्षमा-शांतीने भरलेले असते. त्यामुळे त्यांचा स्वभाव देखील दीनवाणा झालेला असतो आणि बाह्यरुपाने देखील मग अशी माणसे सहसा तशीच दिन-दुबळी दिसू लागतात.
आणि म्हणूनच देवाला सदैव अशांचा कैवाड घ्यावा लागतो. तो नित्य मग यांच्या पाठीशी उभा असतो. किंबहुना तो अखंड मग त्यांचा राखणकर्ताच होतो.
त्यामुळे तुकोबा शेवटी म्हणतात तुम्हाला देवाला जर येथे खरच काही देऊ करायचे असेल, त्याच्या चरणी काही अर्पण करायचे असेल, तर त्यास आपल्या प्रीतीचे प्रेम द्यावे, आपल्या स्वभावतील भाव आणि अंतकरणातील गोडी द्यावी व त्यास सुशोभित करायचे असल्यास स्व-अंगी असलेल्या सात्विक गुणांनीच त...
Read More
तुकाराम महाराज म्हणतात देव भक्ताच्या मनातील, त्याच्या अंतकरणातील आपल्या विषयी किती प्रेम आहे अथवा किती प्रेमभाव व गोडवा आहे तेवढेच पाहतो आणि तेवढेच घेतो.
एवढेच नव्हे तर त्याच्या अंतकरणातील आपल्याप्रति असलेला भाव किती शुद्ध आहे किती खरा आहे हे देखील पाहतो.
त्यात स्वार्थ तर दडलेला नाही ना अथवा कपट तर लपलेले नाही ना हे देखील बघतो आणि एकदा का तसे त्यास दिसून आले की मग तोच त्याचा भक्त होतो, त्याचा सोयरा होतो.
तुकोबा पुढे म्हणतात असा हा देव, म्हणजेच असा हा श्रीहरि येथील साध्या-भोळ्या भक्तांचा, अशा या दीनांचा सोयराच असतो. सखाच असतो.
कारण ज्यांचा भाव येथे शुद्ध झालेला असतो, भोळाभाबडा झालेला असतो, त्यांचे अंतकरण हे नेहमी प्रेमाने आणि दया-क्षमा-शांतीने भरलेले असते. त्यामुळे त्यांचा स्वभाव देखील दीनवाणा झालेला असतो आणि बाह्यरुपाने देखील मग अशी माणसे सहसा तशीच दिन-दुबळी दिसू लागतात.
आणि म्हणूनच देवाला सदैव अशांचा कैवाड घ्यावा लागतो. तो नित्य मग यांच्या पाठीशी उभा असतो. किंबहुना तो अखंड मग त्यांचा राखणकर्ताच होतो.
त्यामुळे तुकोबा शेवटी म्हणतात तुम्हाला देवाला जर येथे खरच काही देऊ करायचे असेल, त्याच्या चरणी काही अर्पण करायचे असेल, तर त्यास आपल्या प्रीतीचे प्रेम द्यावे, आपल्या स्वभावतील भाव आणि अंतकरणातील गोडी द्यावी व त्यास सुशोभित करायचे असल्यास स्व-अंगी असलेल्या सात्विक गुणांनीच त्यास सजवावे. म्हणजेच आपल्या ठायी असलेल्या खऱ्या वैभवाने त्यास शृंगारावे.
आणि आपल्या आचरण आणि वर्तनानेच त्यास आनंद द्यावा, प्रेम द्यावे व आपल्याप्रति प्रीती व माया लावावी.
किंबहुना आपल्या निर्मळ झालेल्या अंतकरणानेच त्यावर पाखर घालावी, त्यावर मायेची फुंकर घालावी. आणि मग पहावे की त्या मोबदल्यात तोच मग तुमच्या प्रेमात पडतो ते.
तुकोबाराय शेवटी म्हणतात अशारीतीने जर आपण देवाची भक्ती केली, त्याची पूजा केली, त्यास खऱ्या आणि शुद्ध भावाचे प्रेम दिले, प्रीती दिली, तर तो आपल्या सोबत मग जेवावयास देखील तयार होतो. आपल्या सोबत मांडीला मांडी लावून पंगतीला बसण्यास देखील तो मग मागे पुढे पाहत नाही.
अभंग १०
Note:
आणि असे का एकदा देवाला भोळ्या भावाचे भक्त सापडले की त्यांना न विचारता तो त्यांच्यासोबत काय करतो हे ऐकून तुम्हास आश्चर्यच वाटेल. ते जाणून घेण्यासाठी वाचत रहा श्री तुकाराम गाथा.
Show Less
Comments
Very good