← मागील अभंग (10)
पुढील अभंग (12) →

जे प्रेमात आंधळे झाले आहेत..

Published on: 23 Sep 2025, 06:13 AM

परिस्थिती / संदर्भ:

पहा अशा मूर्ख लोकांची अंती काय गत होते ते..

पहा पुढील अभंगात तुकोबा काय म्हणतात ते...
Get Started

अभंग क्रमांक: ११


सुखे वोळंबा दावी गोहा । माझे दुख नेणा पहा ।।
आवडीचा मारिला वेडा । होय होय कैसा म्हणे भिडा ।।
अखंड मज पोटाची व्यथा । दुधभात साखर तूप पथ्या ।।

दोपाहरा मज लहरी येती । शुद्ध नाही पदे सूपती ।।
नीज न ये खाली घाली फुले । जवळी न साहती मुले ।।
अंगी चंदन लाविते भाळी । सदा शूळ माझे कपाळी ।।

निपट मज न चले अन्न । पायली गहू सांजा तीन ।।
गेले वारी तुम्ही आणिली साकर । सात दिवस गेली साडे दहा शेर ।।
हाड गळोनी आले मांस । माझे दुख तुम्हा नेणवे कैसे ।।
तुका म्हणे जिता गाढव केला । मेलियावरि नरका गेला ।।

अर्थ:
सर्व सुखात लोळत असलेली एक स्त्री एकदा आपल्या गोहास(पतीस) म्हणते की तुमचे बाबा माझ्याकडे लक्षच नाही. तुम्ही माझे दुःख नेणतच नाहीत, जाणतच नाही. किंबहुना तुम्हाला ते दिसूनही तुम्ही तेथे दुर्लक्ष करत असता.
मी किती दुःखात दिवस कंठत आहे वा त्रासात जगत आहे ते तुम्हास मी सांगितल्या शिवाय कळणारच नाही.
त्यामुळे आज मी तुम्हाला स्वतःहून माझी (राम) कहाणी सांगणार आहे. .
ती सांगू लागते की मला अखंड पोटाची व्यथा असते. सतत माझ्या पोटात काही ना काही कारणाने दुखत असते. म्हणून माझ्या पोटदुखीवर उपाय आणि औषध म्हणून मला वैद्यबुवांनी पथ्यात दूधभात खाण्यास सल्ला दिला आहे आणि त्यावर भरपूर साखर आणि तूप घालण्यास सांगितले आहे.
दुपारच्या प्रहरी(वेळी) तर मला मला विचित्रच लहरी येतात. ज्यामुळे मग मला शुद्धच राहत नाही व चक्कर येऊ लागते. त्यामुळे मला मग सतत झोप घ्यावीशी वाटते. अंथरूणात पडून राहवेसे वाटते.
परंतु त्यात देखील मला व्यवस्थत झोप लागत नाही. कारण त्यावर असलेली गादी मऊसार नाही. त्यामुळे मला त्यावर फुले घालून निजावे लागते.
आणि मुलांचे विचाराल तर लहान मुले मला मुळातच आवडत नाही. त्यामुळे ती जवळ आलेली देखील मला सहन होत नाही.
एवढेच नव्हे तर माझ्या भाळी (कपाळी) नेहमी शूळ उठलेले असते. मला डोकेदुखिचा देखील भयंकर त्रास आहे, त्यामुळे त्यावर औषध म्हणून मला संपूर्ण कपाळासकट सर्वांगाला चंदनाचा लेप लावावा लाग... Read More
← मागील अभंग (10)
पुढील अभंग (12) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!