← मागील अभंग (11)
पुढील अभंग (13) →

ज्ञानाची उपरती होऊनही भक्ति कशी करावी याचे वर्म मात्र ठाऊक नसताना.

Published on: 19 Sep 2025, 04:45 PM

परिस्थिती / संदर्भ:

देवाच्या प्रेमात पडू लागल्यावर तुकोबांची मनाची अवस्था आता कशी झाली आहे ते..

पहा पुढील अभंगात तुकोबा काय म्हणतात ते...
Get Started

अभंग क्रमांक: १२


पावले पावले तुझे आम्हा सर्व । दुजा नको भाव
होऊ देऊ ।।
जेथे तेथे देखे तुझीच पावले । त्रिभुवन संचले
विठ्ठला गा ।।
भेदाभेद मते भ्रमाचे संवाद । आम्हा नको वाद
त्याशी देऊ ।।
तुका म्हणे अणु तुजविण नाही । नभाहुनि पाहीं
वाड आहे ।।

अर्थ:
तुकाराम महाराज म्हणतात हे देवा पांडुरंगा, हे नारायणा, तुझ्याशी अशारितीने एकरूप झाल्याने तुझे सर्वकाही आता आम्हांला लाभत आहे आणि हळूहळू आम्ही देखील तुझ्यासारखेच होत आहोत. तेव्हा तुझ्या आणि माझ्यात पुन्हा यापुढे दुजाभाव होऊ देऊ नकोस.
कारण तसे झाल्यास आम्ही ते आता सहन करू शकणार नाही. किंबहुना यापुढे ते आता शक्यच नाही.
कारण आम्ही आता आमचे राहिलेलो नाही. त्यामुळे यापुढे आमचे आता माघारी फिरणे नाही. किंबहुना ती एक आता अशक्यप्राय गोष्ट झालेली असून आमचे मनच आम्हाला तशी ग्वाही देत आहे.
कारण ते म्हणतात तुझ्याशी आम्ही आता असेकाही एकरूप झालो आहोत की आम्हाला सर्वत्र आता तूच एक दिसू लागला असून आम्हाला सर्वत्र एक तुझीच पाऊले दिसत आहेत.
म्हणजेच जेथे नजर फिरवावी तेथे आम्हाला केवळ तुझ्याच पाऊलांच्या खुणा दिसत असून सर्वत्र आम्हाला एक तुझाच भास होतो आहे.
एवढेच नव्हे तर हे संपूर्ण त्रिभुवनच आम्हासाठी तुझ्या पाऊलांनी भरून गेले असून तुझ्या अस्तित्वानेच व्यापून गेले आहे असे माझ्या मनाचे झाले आहे. आणि त्यामुळेच माझे हे मनोगत आम्हाला तुला सांगणे भाग पडत आहे.
म्हणजेच या संपूर्ण त्रिभुवनात आम्हाला एक तुझीच प्रचिती येत असून सर्वत्र एक तुझाच संचार झालेला आहे अथवा तूच सर्वत्र भरून राहीला आहेस ह्याची हळूहळू अनुभूतीच येऊ लागली आहे.
आणि अशी माझ्या मनाची अवस्था झालेली असताना वा येथवर माझ्या मनाची गत झ... Read More
← मागील अभंग (11)
पुढील अभंग (13) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!