तुकाराम महाराज सर्वांना भक्ती पंथावर येण्यास आवाहन करताना म्हणतात आता अधिक वेळ न दवडता चला आपण देखील सर्वजण एक होऊ आणि आपल्या पुढे गेलेले संतजन पूर्वी ज्या मार्गाने चालत वैकुंठी गेले त्या मार्गाचा माग काढत, शोध घेत त्यावरून जाऊ.
आणि अशा या मनुष्य देहाचे एकमेव ध्येय असलेले हित आपल्या पदरी पाडून घेऊ.
एवढेच नव्हे तर त्या वाटेवरून चालताना त्या मार्गावरील अशा त्या संतसज्जनांच्या पदस्पर्शाने पावन झालेले रजकण, तेथीची धूळ आपण आपल्या भाळी लावू तिचे वंदन करू.
तसेच त्यांनी कडेला फेकलेल्या पत्रावळीतील त्यांचे शेष-उच्छिष्ट आपण सर्व मिळून ग्रहण करू व त्यायोगे आपल्या प्रारब्ध पुसून टाकू.
त्यात असलेले दोष आणि पूर्वकर्माची होळी करू व आपण देखील त्यांच्या सारखे पावन होऊ.
आणि अशारीतीने वा यानिमित्ताने आपण देखील पुण्याचे अमुप असे भांडवल आपल्या गाठीशी बांधू घेऊ व पुढे वाढवतच नेऊ.
आजच्या या कलीयुगात आपल्या सारखा अनाथांचा कोणीही वाली व मार्गदर्शक नसल्यामुळे आपली ही गत झाली आहे.
तेव्हा आपल्या सारख्या अनाथांचा एकमेव नाथ असलेल्या विठ्ठलाची आपण सोय धरू. किंबहुना तो सदैव अनाथांसोबतच असतो हे सर्वांनी ह्यापुढे कायमचे लक्षात ठेवावे.
तो त्याच्या भक्तांना, त्याच्या दासांना किंबहुना त्याच्या लेकरांना कधीही, केव्हाही एकटे सोडत नाही हे देखील ध्यानी असू दयावे.
तुकोबा पुढे म्हणतात, म्हणजे पहा, केवळ अस...
Read More

तुकोबा पुढे म्हणतात, म्हणजे पहा, केवळ असे केल्याने आणि विठ्ठलाच्या नामसंकीर्तनाने व त्याच्या चिंतनाने आपल्या पदरी ह्या इहलोकी असलेला सर्वात मोठा लाभ आपल्या पदरी येईल. किंबहुना केवढेच एवढ्यानेच ह्या पृथ्वीतलावरील जेवढे लाभ आहेत ते सर्वच्या सर्व आपल्या पदरी येतात. ज्यामुळे मग मनुष्य केवळ भाग्यवंत न राहता अशा या थोर भाग्याचा धनीच होतो.
एवढेच नव्हे तर अशा या विठोबाच्या चिंतनाने, त्याच्या नामजयघोषाने अवघी सुखे आपल्या पायांशी लोटांगणे घालतात. तसेच आपल्या जन्म-मरणाच्या खेपा देखील संपुष्टात येऊन त्याच्या फेऱ्यातून आपली एकदाची सुटका होईल आणि संत-सज्जनांनी आधीच सिद्ध करून ठेवलेला हा मार्ग मार्ग मग इतरांसाठी देखील मग अधिक सोपा व सुलभ होईल.
तुकोबाराय शेवटी म्हणतात त्यामुळे आम्ही तुम्हाला स्वतःहून घ्यायला आले आहोत. त्यामुळे तुम्ही कोणतीही चिंता न करता व काशासही न भिता व घाबरता आमच्या मागे यावेत. आणि एवढा मोठा आनंदाचा ठेवा सापडला असता त्यापुढे ह्या व्यर्थ जीवाची किंव करत बसू नयेत.
किंबहुना त्यावर चिरा(दगड) घालून ह्या जीवाच्या खऱ्या -खुऱ्या निजस्थानाला म्हणजेच माहेराला जाऊ.
अभंग १३
Show Less
Comments
No comments yet. Be the first to comment!