← मागील अभंग (13)
पुढील अभंग (15) →

स्वहित कसे साधावे?

Published on: 02 Oct 2025, 04:37 PM

परिस्थिती / संदर्भ:

पहा पुढील अभंगात तुकोबा काय म्हणतात ते...
Get Started

अभंग क्रमांक: १४


जेविले ते संत मागें उष्टावळी । अवघ्या पत्रावळी
करुनी झाडा ।।
सोवळ्या ओंवळ्या राहिलों निराळा । पासूनि सकळां
अवघ्यां दुरीं ।।
परें परतें मज न लागे सांगावें । हें तों देवें
बरें शिकविलें ।।
दुसर्‍यातें आम्ही नाहीं आतळत । जाणोनि संकेत
उभा असे ।।
येथें कोणीं कांहीं न धरावी शंका । मज चाड
एका भोजनाची ।।
लांचावला तुका मारितसे झड । पुरविलें कोड
नारायणें ।।

अर्थ:

तुकाराम महाराज म्हणतात जेव्हा-केव्हा ह्या संतमंडळींची पंगती उठतात तेव्हा त्यांच्या उष्टावळीचे मी मन निवेपर्यंत सेवन करतो. त्यासाठी त्यांनी टाकलेल्या सर्व पत्रावळी मी जमा करून त्यातील उच्छिष्टाचा मी चांगलाच समाचार घेतो आणि त्यातील त्यांचे राहिलेले उच्छिष्ट सेवन करतो.
आणि तसे करताना मी कोणत्याही सोवळ्या-ओवळ्याचा विचार करत नाही. किंबहुना त्यापासून मी आता फारकत घेतलेली असून मी त्यापासून सर्वतोपरी निराळाच झालो आहे. किंबहुना अशा या गोष्टींपासून मी फार दूर निघून गेलो आहे.
ते म्हणतात आजकाल मला परमार्थ आणि त्याविषयी नेमके काय केले पाहिजे हे आता सांगावे लागत नाही. कारण खुद्द नारायणच माझा आता गुरु झाल्याने तोच मला हे सर्व ज्ञान देऊ करत असतो. किंबहुना अशा या पारमार्थिक ज्ञानाचे मला त्याकडूनच शिकवण मिळत आहे.
किंबहुना या प्रकृतीतील आणि प्रकृतीपल्याड(परेपलीकडचे) ज्ञान हल्ली तोच मला देत असतो. एवढेच नव्हे तर द्वैत आणि अद्वैताचे ज्ञान देखील तोच मला देऊ करत असल्याने दुसऱ्याचे म्हणजे द्वैताचे, दुजाभावाचे अज्ञान माझ्या चित्ताला आता शिवत देखील नाही.
त्यामुळे माझ्या ठायी असलेला आप-पर भाव देखील संपुष्टात आला असून आपले-परके हे मी आता जाणत देखील नाही. सर्वकाही मला आता एक झाले असून त्यायोगे एकतत्व योग देखील चांगलाच कळून चुकला आहे.
किंबहुना ह्या एकतत्वाचा संकेत वा या संकेताची खूण कळून चुकल्यामुळे... Read More
← मागील अभंग (13)
पुढील अभंग (15) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments
Jayant Deotale (2026-03-30 11:05:13)

Good

Yash mhetre (2025-10-04 01:52:25)

Nice