← मागील अभंग (14)
पुढील अभंग (16) →

स्वहित कसे साधावे?

Published on: 02 Oct 2025, 04:56 PM

परिस्थिती / संदर्भ:

पहा पुढील अभंगात तुकोबा काय म्हणतात ते...
Get Started

अभंग क्रमांक: १५


देवाच्या प्रसादे करा रे भोजन । व्हाल कोण कोण
ते अधिकारी ।।
ब्रम्हादिकांसि हे दुर्लभ उच्छिष्ट । नका मानू
वीट ब्रम्हरसी ।।
अवघीयांपुरते वोसंडले पात्र । अधिकार सर्वत्र
आहे येथे ।।
इच्छादानी येथे वळला समर्थ । अवघेचि आर्त
पुरवितो ।।
सरे येथे ऐसे नाही कदा काळी । पुढती वाटे कवळी
घ्यावे ऐसे ।।
तुका म्हणे पाक लक्षुमीच्या हाते । कामारी सांगाते
निरुपम ।।

अर्थ:
तुकाराम महाराज म्हणतात ज्या कोणाला येथे नरदेह लाभला आहे त्याने ह्या भक्तीरसरूपी देवाच्या प्रसादाचा संपूर्ण लाभ घ्यावा. म्हणजेच भक्तिमार्गाला लागून स्वतःचा उद्धार करून घ्यावा व उचित असे मनुष्य जन्माचे हित पदरी पाडून घ्यावे.
कारण हा प्रसाद ब्रह्मादिकांना देखील उपलब्द्ध नसून केवळ आणि केवळ नरयोनीत जन्माला आलेल्यांनाच त्याचा लाभ घेता येतो.
कारण ब्रह्मादि देवांना भक्ती करण्याचा अधिकार नसल्याने हा प्रसाद (हा भक्तीरस) त्यांना लाभत नसून त्यांच्यासाठी त्याचे साधे उच्छिष्ट (उष्टे) देखील दुर्लभ आहे...
त्यामुळे ह्याउपर अधिक वेळ न दवडता सर्वांनी शक्य तितक्या लवकर भक्तिमार्गाला लागून स्वतःचे हित साधून घ्यावे.
एवढेच नव्हे तर अशा ह्या ब्रह्मरसाचे सेवन करण्याचा येथे सर्वाना समान अधिकार असून एखादा इच्छादानी (इच्छुक) असो किंवा समाजात समस्त गोष्टीं लाभलेला एखादा समर्थ असो... येथील सर्वजण याचे अधिकारी असून या इहलोकातील प्रत्येकास त्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे.
म्हणजेच अशा या लाभाचा भुलकोवरील प्रत्येक जीवजंतु संपूर्ण अधिकारी असून सर्वांसाठी हे पात्र ओसंडून वाहत आहे...
व आनंदाची बाब म्हणजे हा ब्रह्मरस, हा आनंद कधीकाळी सरेल किंवा कमी होईल किंवा यात किंचितदेखील घट होईल असे घडत नाही...
उलट जितका तो घ्यावा तितका तो अजून घेत राहावा असेच वाटत राहते, म्हणजेच जेवढे ह्या भोजनाचे कवळ घ्यावे तेवढे ... Read More
← मागील अभंग (14)
पुढील अभंग (16) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!