तुकाराम महाराज म्हणतात ज्याप्रमाणे अवगुणी लोकांची अंती फजितीच होऊन त्यांच्या हाती शेवटी नामुष्कीच येते, त्याप्रमाणेच भक्तीचे सोंग घेणाऱ्यांचे देखील काहीशी तशीच परिस्थिति होते. किंबहुना त्यांची देखील अंती काहीशी तीच गत होऊ तशीच अवस्था होते.
कारण मनी भाव नसताना केवळ मान मिळावा म्हणून ते भक्तीचा जो काही आव आणतात त्याने अंती त्यांच्या पदरी केवळ निराशाच येते. एवढेच नव्हे तर चांगलीच विटंबना देखील होते.
कारण ते म्हणतात येथे भक्तिमार्गात सर्वकाही एक भावाशीच निगडीत असल्याने नेमका तोच नसेल तर केवळ बाह्य दीखाव्याला काहीही अर्थ नसून त्यास काडीचेही मोल नसते.
ते पुढे म्हणतात ज्याप्रमाणे एखाद्या पात्रात कोणता पदार्थ आहे अथवा कोणता रस आहे ह्याच्याशी त्या भांड्याचा काहीही संबंध नसतो वा नसावा.
कारण त्या भांड्यातील पदार्थाला चव आहे की नाही किंवा त्याचे प्रमाण किती फिके आहे वा किती गोड आहे त्यावर त्यातील रस वा पदार्थाची योग्यता ठरत असते आणि बहुधा सर्वांना देखील त्याच्याशीच चाड असते.
एवढेच नव्हे तर बाहेरील भांड मग सोन्याचे असुदेत वा चांदीचे. किंबहुना अशा भांड्यात मग विष देखील असले तर मग कोणीही वेडा देखील मग त्यास तोंड लावत नाही वा लावू नये हे कोणासही सांगावे लागत नाही.
अगदी त्याप्रमाणेच भक्तीचे देखील असते.
देवाला देखील भक्ताच्या बाह्यरुपाशी केव्हाच काही घेणेदेणे नसते. त्यास केवळ तो करत अस...
Read More

देवाला देखील भक्ताच्या बाह्यरुपाशी केव्हाच काही घेणेदेणे नसते. त्यास केवळ तो करत असलेल्या भक्तीत किती भाव आहे, किती गोडी आणि रस आहे एवढ्याचीच चाड असते आणि तो तेवढेच पाहतो आणि तेवढेच काय ते घेतो.
म्हणून तुकोबाराय शेवटी म्हणतात की देवाची भक्ती करण्यासाठी सर्वात आवश्यक असलेली गोष्ट म्हणजे त्याच्याप्रतीचा शुद्ध भाव, कारण देव त्यानेच काय तो प्रसन्न होतो आणि त्यानेच मनुष्याचे हित देखील साधले जाते.
परंतु केवळ खोट्या भक्तीचा आव आणून किंवा त्याचे सोंग घेऊन कोणताही लाभ पदरी येत आणि कोणतेही साध्य देखीळ हाती लागत नाही. उलट झालीच तर त्या मनुष्याची/व्यक्तीची केवळ निराशाच होते. त्यावर नामूषकीच ओढावते.
अभंग १६
ते पुढील एका अभंगात म्हणतात अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची..
Show Less
Comments
No comments yet. Be the first to comment!