अभंग क्रमांक: ८४
मान अपमान गोवें । अवघे गुंडूनी
ठेवावे ।।
हेचि देवाचे दर्शन । सदा राहे
समाधान ।।
शांतीची वसती । खुंटे
काळगती ।।
आली उर्मी साहे । तुका म्हणे
थोडे आहे ।।
// भक्ती कशी करावी
अर्थ:
त्याग कसा करावा: त्याग करण्याची गरज नाही: म्हणूनच येथे कोणीही व्यर्थ त्यागाच्या भानगडीत पडू नये कारण सर्वभोगी असलेला नारायणच नेहमी सर्वांचे सर्व (चांगले वाईट) भोग भोगत असतो, देवाच्या अंगाला अंग लावून(म्हणजेच त्याचे नाम गाऊन) सर्व भोग भोगल्याने ते थेट त्यालाच अर्पण होतात आणि त्या भोगांचा मग सहजच त्याग घडून येतो...
Read More
त्याग कसा करावा: त्याग करण्याची गरज नाही: म्हणूनच येथे कोणीही व्यर्थ त्यागाच्या भानगडीत पडू नये कारण सर्वभोगी असलेला नारायणच नेहमी सर्वांचे सर्व (चांगले वाईट) भोग भोगत असतो, देवाच्या अंगाला अंग लावून(म्हणजेच त्याचे नाम गाऊन) सर्व भोग भोगल्याने ते थेट त्यालाच अर्पण होतात आणि त्या भोगांचा मग सहजच त्याग घडून येतो
Show Less
Comments
No comments yet. Be the first to comment!