← मागील अभंग (69)
पुढील अभंग (71) →

अभंग क्रमांक: ७०


गेली वीरसरी । मग त्यासी
रांड मारी ।।
मग नये तैसी सत्ता । गेली
मागील आणिता ।।
भंगलिया चित्ता । न ये
काशाने साधिता ।।
तुका म्हणे धीर । भंगलिया
पाठी कीर ।।

अर्थ:
तुकाराम महाराज म्हणतात एकदा का माणसातले वीरत्व गेले, म्हणजेच एकदा का त्याचे धैर्य सुटले आणि खचले की अशा त्या माणसाला मग एखादी शुद्र रांड सुद्धा सहज मारू शकते आणि अशारितीने त्याचा पूर्ण पाडाव झाल्यानंतर पुढे कितीही प्रयत्न केला तरीही त्याला मागील/पूर्वीची सत्ता पुन्हा केव्हाही आणता येत नाही किंवा मिळवता येत नाही.
(म्हणजेच एखाद्याची फजिती होऊन किंवा नाचक्की होऊन जर त्याला सत्ता गमवावी लागली तर अशा माणसाला सत्ता परत मिळूनही पूर्वीचा मान आणि रुबाब केव्हाही तसाच्या तसा मिळवता येत नाही किंबहुना तो त्याला काहीकेल्या पुन्हा लाभत नाही.)
ते म्हणतात तसेच एकदा मनुष्याचे चित्त भंगले किंवा काही कारणास्तव जर का त्याला तडा गेला की ते पुन्हा मिळून येत नाही, कितीही प्रयत्नाने ते पुन्हा जोडता येत नाही.
तुकोबाराय शेवटी म्हणतात की मनुष्याच्या धैर्याचे देखील अगदी तसेच आहे, त्याने स्वतःचा धीर कधीही खचू देऊ नये, कारण एकदा का माणसाचा धीर खचला तर मग त्याला काहीही करून तो परत आणता येत नाही आणि अशा मनुष्याच्या मागे आयुष्यभरासाठी मग प्रत्येक गोष्टीची किरकिर लागते. (म्हणजेच धैर्य खचल्याने त्याला प्रत्येक गोष्टीचे भय वाटू लागते, लहानसहान गोष्टींची त्याला किरकिर वाटू लागते आणि शेवटी प्रत्येक गोष्टीपासून माघार घेण्यावाचून त्याकडे पर्यायच उरत नाही.)
अभंग ७०... Read More
← मागील अभंग (69)
पुढील अभंग (71) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!