← मागील अभंग (68)
पुढील अभंग (70) →

स्वहित कसे साधावे?

Published on: 23 Oct 2025, 04:48 AM

परिस्थिती / संदर्भ:

पहा पुढील अभंगात तुकोबा काय म्हणतात ते...
Get Started

अभंग क्रमांक: ६९


भोरप्याने सोंग पालटिले वरी । बकध्यान धरी मत्स्या जैसे ।।
टिळे माळा मैंद मुद्रा लावी अंगी । देखो नेदी जगी फासे जैसे ।।
ढीवर या मत्स्या चारा घाली जैसा । भीतरील फांसा कळो नेदी ।।
खाटिक हा स्नेहवादे पशु पाळी । कापावया नळी तयासाठी ।।
तुका म्हणे तैसा भला मी लोकांत । परी तू कृपावंत पांडुरंगा ।।

अर्थ:
तुकाराम महाराज म्हणतात की ज्याप्रमाणे एखादा भोरप्या स्वतःचे बाह्यरूप पालटून इतरांची दिशाभूल करतो, किंवा ज्याप्रमाणे एखादा बगळा जसा मत्स्य पकडण्यासाठी एका पायावर उभा राहून ध्यान लावण्याचे सोंग घेतो किंवा एखादा मैंद मनुष्य (म्हणजेच ढोंगी भक्त) ज्याप्रमाणे अंगी टिळे, माळा, मुद्रा धारण करतो, जेणेकरून इतर जनांना त्याच्या मनीच हेतु दिसून येऊ नये व तो त्यांना स्वतःच्या जाळ्यात अगदी सहजरित्या ओढू शकेल.
किंवा एखादा धीवर (म्हणजेच कोळी) जसा माश्यांना खाण्यास चारा टाकतो परंतु त्यामधील लपलेला फासा त्यांना कळू देत नाही व पर्यायाने आपल्या भीतरील कपट देखील त्यांना काहीकेल्या कळू देत नाही, किंवा एखादा खाटीक जसा अतिशय प्रेमाने आणि लाडाने आपल्या जवळील पशूंचे पालन-पोषण करतो, त्यांना वाढवतो, जेणेकरून एकदिवस ते धष्टपुष्ट होतील व अंती तो त्यांची नळी कापू शकेल.
त्याप्रमाणेच हे देवा पांडुरंगा, हे देवा नारायणा, माझे देखील झाले आहे. मी देखील अगदी या लोकांप्रमाणेच कपटी झालो असून वर ढोंगी देखील झालो आहे. आणि वर भलेपणाचा आव देखील आणत आहे.
परंतु हे पांडुरंगा, तू मात्र अत्यंत दयाळू-मायाळू आहेस आणि वर कृपावंत देखील आहेस. पतितांना पावन करून घेणारा पतितपावन आहेस. त्यामुळे मी कसाही असलो तरीही अखेरिस तू माझ्यावर कृपा करून माझा उद्धार करशील हे मी जाणून आहे. ... Read More
← मागील अभंग (68)
पुढील अभंग (70) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!