← मागील अभंग (67)
पुढील अभंग (69) →

त्याग म्हणजे काय?

Published on: 30 Sep 2025, 06:41 AM

परिस्थिती / संदर्भ:

भोग व त्याग ह्यांतील संबंध. त्याग कसा व केव्हा घडून येतो?

पहा पुढील अभंगात तुकोबा काय म्हणतात ते...
Get Started

अभंग क्रमांक: ६८


भोगे घडे त्याग । त्यागें अंगा येती भोग ।।ऐसे उफराटे वर्म । धर्मा अंगीच अधर्म ।।देव अंतरे ते पाप । खोटे उगवा संकल्प ।।
तुका म्हणे भीड खोटी । लाभ विचाराचे
पोटी ।।

अर्थ:
तुकाराम महाराज म्हणतात जो विचारपूर्वक आणि विहिताला धरून विषय भोगतो त्याला त्यागाचे सुख लाभते, परंतु जो लाभापोटी विषयाचा त्याग करतो अशा त्यागातून त्याच्या वाट्याला केवळ भोगच येतात.
तुकाराम महाराज म्हणतात वरवर पाहता हे विधान कितीही अन्यथा(चुकीचे) व उफराटे वाटत असले तरी हेच सत्य आहे, कारण लाभासाठी व स्वार्थासाठी केलेला त्याग हा खरा नसून केवळ देखाव्यापुरता असतो आणि विहित कर्तव्य करण्यासाठी केलेले कोणतेही कर्म हे नेहमी त्यागासमान असते.
कारण ते म्हणतात अधर्म हा कितीही धर्मासारखा वाटत असला तरीही किंवा तो तसा कितीही भासवण्याचा प्रयत्न केला तरीही त्यामागील खरा हेतू लक्षात घेऊनच त्याकडे पाहावे आणि तसे पडताळल्यावरच कळून येते की धर्माच्या नावाखाली अधर्मच अधिक होत आहे किंवा असतो.
ते पुढे सांगतात की ज्या कोणत्या कर्माने देव अंतरतो ते पाप आहे आणि त्यासाठी केलेला संकल्पदेखील खोटा समजावा, त्यामुळे कोणी असे संकल्प करूच नये .
तुकोबाराय शेवटी म्हणतात अशा लोकांनी 'आपण किती देवाला घाबरतो व त्यासाठी कर्मकांडांत जराही कमतरता येऊ देत नाही' असे कितीही दाखवायचे प्रयत्न केले तरी ते पूर्ण खोटे असते, कारण ते म्हणतात अशा लोकांच्या चित्ती देवाविषयीची भीड सर्वथा खोटी असून कर्मकांडापासून होणाऱ्या किंवा मिळणाऱ्या लाभाचे विचारच त्यांच्या मनी अधिक असतात.
अभंग ६८... Read More
← मागील अभंग (67)
पुढील अभंग (69) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!