तुकाराम महाराज म्हणतात..
हे देवा पुरुषोत्तमा, हे मायबापा,
मी तुला आळवतोच या कारणासाठी आहे की,
या संसाराच्या तापाने मी अक्षरशः आता तापलो आहे,
आणि ह्या कुटुंबाची सेवा करून तर पार शिणलो आहे,
त्रासून गेलो आहे.
आणि म्हणूनच मला तुझी,
तुझ्या पायांची आठवण होते आहे.
तेव्हा आता तरी हे देवा पांडुरंगा,
माझ्यासाठी धाव घे आणि माझी या संसारातून एकदाची सुटका कर.
आणि मला या मायेतून व या भवनदीतून एकदाचे बाहेर काढ.
कारण आजवर कित्येक जन्म मी हेच करत आलो आहे.
एवढेच नव्हे तर बहुता जन्मीचा मी भारवाही झालो असून,
स्वबळाने ह्यासर्वातून स्वतःची कशी सुटका करून घ्यावी,
ह्यातून आपली मान कशी सोडवून घ्यावी,
हे मला ठाऊक नाही.
ह्याचे मला ज्ञान झालेले नाही.
आणि ह्याचे वर्म, त्याचे गुपित देखील अद्याप
माझ्या हाती लागलेले नाही.
तेव्हा हे मायमाऊली, हे अनाथांची साऊली,
आता तरी माझ्यासाठी धाव घे.
एवढेच नव्हे तर या इंद्रियरूपी चोरांनी मला
अंतर्बाह्यात्कारी वेढले असून या कामक्रोधादिक षड्रिपुंच्या
मी चांगलाच कचाट्यात सापडलो आहे.
आणि त्यातील कोणीही अद्याप माझ्यावर
दया करत नसून कोणालाही माझी साधी
कणवही येत नाही.
अशातऱ्हेने मी चांगलाच पांगविलो जात असून
यात सर्वस्वी नाडला देखील जातो आहे.
आणि वर या संसाराने देखील माझा जीव एवढा
कासावीस केला आहे की माझाच जीव मला आता
नकोसा झ...
Read More

नकोसा झाला आहे.
त्यामुळे हे माये तू आता किंचितही विलंब न
लावता धावत ये.
आणि माझ्यावर आलेल्या या
संकटातून माझी एकदाची
मुक्तता कर .
आणि या गर्भवासातून देखील
माझी कायमची सुटका कर.
आणि त्याद्वारे भक्तांनी तुला प्रेमाने देऊ केलेले
दीनानाथ हे ब्रीद खरे करून दाखव.
अभंग ६६
Show Less
Comments
No comments yet. Be the first to comment!