← मागील अभंग (63)
पुढील अभंग (65) →

जे संतांना छळतात, त्यांना क्षोभवितात, त्यांची निंदा करतात, त्यांना दूषणे देतात ..

Published on: 14 Aug 2025, 08:43 AM

परिस्थिती / संदर्भ:

जे संतांना छळतात, त्यांना क्षोभवितात, त्यांची निंदा करतात, त्यांना छळतात अशांचे तोंड मला दाखवू नकोस, त्यांचे दर्शन देखील नको.

पहा पुढील अभंगात तुकोबा काय म्हणतात ते...
Get Started

अभंग क्रमांक: ६४


बोलायाचा त्याशी । नको संबंध
मानसी ।।
जया घडली संतनिंदा । तुज विसरुनी
गोविंदा ।।
जळो त्याचे तोंड । नको दृष्टीपुढे
भांड ।।
तुका म्हणे देवा । त्या दुरी
मज ठेवा ।।

अर्थ:
तुकोबा म्हणतात जे संतांना छळतात, त्यांना क्षोभवितात, त्यांना त्रास देतात, त्यांची निंदा करतात, त्यांना छळतात, हे देवा अशांशी मला बोलायचे देखील नाही. अशांचे मला तोंड देखील दाखवू नकोस, अशांची मला स्वप्नात देखील दर्शन नको. किंबहुना अशा लोकांशी मला मनात देखील संबंध ठेवायचे नाहीत.
ते पुढे म्हणतात ज्यांच्याकडून संतनिंदा घडते, त्यांना दूषणे प्राप्त होतात, हे गोविंदा, हे नारायणा, जे या जगतात तुला देखील विसरले आहेत, किंबहुना ज्यांना तुझे देखील येथे विस्मरण घडले आहे, त्यांचे देखील तोंड जळो. असे भांड मला माझ्या दृष्टीसमोर देखील नको.
तुकोबाराय शेवटी म्हणतात हे देवा, हे नारायणा मला अशा भांडखोर लोकांपासून देखील मला माझ्या दृष्टीपुढे नको. अशांपासून देखील तू नित्य मला नेहमी दूरच ठेव. किंबहुना मी केव्हाही यापुढे त्यांच्या संपर्कात येणार नाही असेच करा.
अभंग ६४... Read More
← मागील अभंग (63)
पुढील अभंग (65) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!