← मागील अभंग (61)
पुढील अभंग (63) →

देवा आता संतसंगती दे.

Published on: 14 Oct 2025, 06:46 AM

परिस्थिती / संदर्भ:

हे देवा यापुढे मला माझ्याच जातीचे लोक भेटू दे, मला संतसज्जनांचीच संगत मिळू देत. जेणेकरून माझा अंती उद्धार होईल व माझे आयुष्य देखील सुखकर होईल.

पहा पुढील अभंगात तुकोबा काय म्हणतात ते...
Get Started

अभंग क्रमांक: ६२


कानडीने केला म्हराटा भ्रतार । एकाचे उत्तर
एका नये ।।
तैसे मज नको करू कमळापति । देई या
संगती सज्जनांची ।।
तिने पाचारिले इल बा म्हणोन । येरु पळे आण
झाली आता ।।
तुका म्हणे येरा येरा जे विच्छिन्न । तेथे वाढे
शीण सुखापोटी ।।

अर्थ:
तुकाराम पुढील अभंगात म्हणतात एकदा एका मराठी माणसाने कानडी स्त्रीशी विवाह केला, तिच्याशी लग्न केले. परंतु लग्नानंतर मात्र विचित्र गोष्टींशीच त्यांना सामना करावा लागला.
ते म्हणतात दोघांची भाषा एकमेकांच्या भाषेपेक्षा संपूर्णपणे वेगळी असल्याने दोघांना एकमेकांचे काहीएक कळत नसे.
एखाद्याने काहीएक प्रश्न विचारलं असता, त्याचे उत्तर दुसऱ्याकडून मात्र भलतेच यायचे. त्यामुळे रोजचेच दोहोंमध्ये गैरसमज वाढीला लागले.
उदाहरणार्थ एकदा कानडी स्त्रीने आपल्या नवऱ्यास इलबा म्हणून पाचारिले असता त्याने केवळ बा म्हणून त्याचा अर्थ काढला आणि त्यास वाटू लागले की आपली बाईल आपणास वडील नावाने का हाक मारते आहे. बाबा म्हणून का संबोधिते आहे.
ज्यामुळे मग त्याच्या मनात नको-नको त्या कुशंका येऊन तो तिच्यापासून दूर पळू लागला. किंबहुना रोजच असे घडू लागल्यामुळे तो दैनंदिन जीवनात तिच्या पासून लांबच राहू लागला. आणि दोघांमध्ये प्रेम वाढायचे सोडून गैरसमजच अधिक वाढू लागले आणि शेवटी तर त्यातून वाद, विवाद, तंटे होऊ लागले.
आणि अशा या गैरसमजामुळे त्यांचा आयुष्यात सुख वाढायचे सोडून त्रासच वाढीला लागला. सुखाईवजी दुःखच वाढीला लागले.
त्यामुळे तुकोबा देवाला म्हणतात देवा कृपया करून तू माझ्या सोबत मात्र असे काही घडू देऊ नकोस. मला अशा विचित्र परिस्थितीशी गाठ पडेल असे करू नकोस.
मला यापुढे माझ्याच जातीचे लोक भेटू देत. किंबहुना ... Read More
← मागील अभंग (61)
पुढील अभंग (63) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!