मैत्र केला महा बळी । कामा नये
अंतकाळी ।।
आधी घे रे राम नाम । सामा भरी
हा उत्तम ।।
नाही तरी यम । दात खातो
करकरा ।।
धन मेळविल्या कोडी । काळ घेतल्या
न सोडी ।।
कामा न ये हा परिवार । सैन्य लोक
बहु फार ।।
तववरी तुमचे बळ । जंव आला
नाही काळ ।।
तुका म्हणे बापा । चुकवी चौरयांशीच्या
खेपा ।।
भक्ती का करावी? काळापासून वाचण्यासाठी, जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी
Comments
No comments yet. Be the first to comment!