तुकाराम महाराज पुढे सांगतात, “एवढे सांगूनही लोकांना कळत नाही हे पाहून अशांना जागवण्यासाठी व भानावर आणण्यासाठी मी पुनः एकदा सर्वांनाच कळवळ्याने सांगतो की निदान आता तरी तुम्ही सर्वांनी भानावर यावे आणि स्वहिताचा काहीतरी विचार करावा.
ते म्हणतात की, ‘मनुष्याला ह्या संसाराच्या हातून केव्हाही समाधान लाभत नाही, वा तो करत असलेल्या प्रपंचाकडून त्यास केव्हाही संपूर्ण सुख मिळत नाही आणि पूर्वी कधीही लाभले आहे असेही नाही.
तरीही त्यांची संसार करण्याची हौस मात्र कमी होत नाही आणि फिटतही नाही, आणि त्याचा जीव देखील काहिकेल्या हट्ट सोडत नाही.’
एवढेच नव्हे तर अशा ह्या संसाराकडून त्यांना क्षणभरदेखील विश्रांती लाभत नाही वा कोणेकाळी मिळाली आहे असे देखील नाही. उलट मनुष्य शोधत असलेला असा हा विसावा केव्हा त्याच्या पदरी आला आहे वा पुढे केव्हा येईल असेही घडत नाही.
कारण मुळात हा संसार असतोच तसा. म्हणजेच अशा ह्या संसाराची हीच गुण-वैशिष्ट्ये असून वा दोष-अवगुण असून त्याचा स्वभाव मुळातच हा तसाच असतो. किंबहुना असे म्हंटले तरीही वाउगे ठरणार नाही.
म्हणजेच मनुष्याने ह्या संसाराची कितीही प्रशंसा केली, त्याचे कितीही गोडवे गायले व त्याची कितीही सेवा केली किंवा त्याचे कितीही लाड पुरविले तरीही या संसाराचे आणि पर्यायाने त्याचे केव्हाही काडीचेही समाधान होत नाही व होताना देखील दिसत नाही.
आणि मुख्य म्हणजे त्याची एवढी कड...
Read More

आणि मुख्य म्हणजे त्याची एवढी कड घेऊनही वा चिंता वाहूनही तो अंती कोणाचेही केव्हाही भले करत नाही वा करताना आढळतही नाही.
उलट, मनुष्याची दमछाक करण्यात मात्र तो धन्यता मानतो. किंबहुना त्यांना दुखीकष्टी करून, चिंताग्रस्त करून अंती ते स्वतःच स्वतःचा घात कसा करतील वा ओढवून घेतील हेच पाहतो.
म्हणजेच अशी ही संसारात गुंतलेली माणसे स्वतःहूनच स्वतःला कसे नाडतील, पीडतील ह्याचीच तो अधिक काळजी घेतो. आणि अंती तर त्यांना त्यांचाच जीव कसा नकोसा होईल हे देखील पाहतो.
आणि एवढेच नव्हे तर त्यांना तो स्वतःमध्ये एवढा गुंतवतो वा गुंतवत नेतो की पुढे त्यांना काय चूक काय बरोबर हे देखील दिसेनासे व कळेनासे होते. कारण आपल्या नादाला लावून ते कसे आयुष्यभर भ्रमात राहतील हेच त्याचे मुख्य उद्दिष्ट असते.
म्हणजेच काय तर सर्वांना प्राणाहून प्रिय असलेला आपला हा संसार हेच आपल्या दुःखाचे मूळ कारण होते, आहे वा असते हे अगदी शेवटापर्यंत येऊन पोचल्यावरही आकळून येत नाही. आणि बहुधा सांगूनही पटत नाही.
अशारीतीने तो मनुष्यास एवढे भ्रमिष्ट करून सोडतो की अंती ते स्वतःच स्वतःचे अहित करून त्यापायी स्वतःचा सर्वनाश करून घेतात.
आणि एवढे करूनही तो शांत बसत नाही वा त्याचे काहिकेल्या समाधानही होत नाही. त्याची कटकारस्थाने पुढे सुरूच राहतात. कारण त्याचे मनोगत काही औरच असते.
म्हणजेच आपल्यामध्ये मनुष्यास गुंतवून ठेवणे हेच त्याचे एकमेव कर्तव्य असून तोच त्याचा काय तो एकमेव धर्म देखील असतो आणि तो ते नेमाने व प्रामाणिकपणे करत असतो.
तो त्यांना स्वतःभोवती एवढे गाफील ठेवतो की आपण नेमके कोण आहोत व काय करत आहोत, येथे या भूतलावर नेमके कशासाठी आलो आहोत, व आपला जन्म नेमका कोणत्या कारणासाठी झाला आहे ह्या मूळ उद्देशाचाच त्यास विसर पडू लागतो वा विस्मरण घडते.
म्हणजेच असा हा आत्मघातकी संसार मनुष्यास स्वतःशी बांधून ठेवण्यात एवढा यशस्वी होतो की तो त्यास आजन्म त्याच्या आणि पर्यायाने या मनुष्यजन्माच्या खऱ्या हिताच्या आसपास देखील फिरकू देत नाही.
किंबहुना तो त्यांना त्यांच्या हितापासून पदोपदी दूर नेत राहतो आणि जाणीवपूर्वक त्यास स्वहितापासून लांबच ठेवतो व त्याच्या हातून आयुष्यभर स्वतःचीच सेवा कशी घडेल वा करवून घेता येईल एवढेच काय ते पाहतो आणि त्यात त्यास सरशी देखील लाभते.
परंतु त्याच्या हिताचे मात्र चुकूनही त्याच्या पदरी पडू देत नाही. व याची शेवटपर्यंत तो चांगलीच खबरदारी देखील घेतो.
तरीदेखील येथील प्रापंचिक माणसे मात्र डोळे मिटून आंधळ्यासारखे त्याचे गुण गात राहतात. त्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव करतात.
कारण तोच काय तो येथे एक खरा असून तोच आपल्याला आयुष्याच्या परमोच्च आनंदाकडे नेईल यावर त्यांचा गाढा विश्वासच असतो. किंबहुना तोच एकमेव काय ते या जगातील सत्य आहे ह्यावर त्यांची दृढ श्रद्धाच असते.
म्हणजेच काय तर तोच काय तो आपल्याला अंती खराखुरा आनंद मिळवून देऊन खरा परमानंद देखील तोच प्राप्त करून देईल यावर त्यांची गाढ श्रद्धाच असते व शेवटपर्यंत ते या भ्रमातच जगत राहतात. किंबहुना तशी स्वतःची समजूतच काढून घेतात.
त्यामुळे त्यांच्या चित्तात सदैव एक त्याचाच विषय घोळत असतो व सदासर्वकाळ ते एक त्याच्याच नामाचा जयघोष करतात वा करताना आढळतात.
किंबहुना दिवसरात्र ते एकच कामधंदा करतात आणि तो म्हणजे अशा ह्या विश्वासघातकी संसाराची काळजी वाहणे, त्याची चिंता करत बसणे व तो अखेरपर्यंत सुखरूप कसा करता येईल हेच पाहणे.
आणि हे कमी म्हणून की काय त्यांच्याठायी देखील नित्य एक विषयांचाच गोंधळ गाजत असतो. ती देखील त्यांची पाठ केव्हाही सोडत नाही.
आपल्या स्त्रीचे, आपल्या कुटुंबाचे समाधान कसे होईल, तिच्या सर्व इच्छा कशा पुरविल्या जातील एवढाच काय तो विचार नित्य त्यांच्या ठायी असतो. आणि सदैव हेच विचार करताना ते दृष्टीस पडतात व त्यासाठी ते स्वतःचे उभे आयुष्य देखील खर्ची करतात, वेचतात आणि केव्हाकेव्हा तर पणाला देखील लावतात.
म्हणजेच काय तर आपले नाही झाले तरीही आपल्या कुटुंबाचे मात्र पूर्णपणे समाधान झाले पाहिजे वा होणे गरजेच आहे, किमान त्यांचे तरी पारणे फिटावयास हवे अशी त्यांची इच्छा असते. त्यामुळे नित्य त्यादिशेनेच त्यांचे प्रयत्न सुरू असतात व ते घेतानाही दिसतात.
परंतु हे करताना दुसरीकडे मात्र आपले देवाकडे संपूर्णपणे दुर्लक्ष होते आहे हे ते विसरतात. किंबहुना देवधर्म संपूर्णपणे बाजुला पडून देवाचे दर्शन घेण्यास देखील आपल्यास सवड नाही वा हा संसारच त्यास सर्वस्वी कारणीभूत आहे हेच त्यांना कळेनासे होते. त्यांच्यासाठी देवदर्शन एक दुर्लभच गोष्ट होऊन बसते.
एवढेच नव्हे तर अशा ह्या संसारापायी आपण आपल्या हिताकडेच पाठ फिरवली आहे, त्यास संपूर्णतः विन्मुख झालो आहोत ह्याचे देखील त्यांना विस्मरण घडते.
त्यामुळे अशा ह्या लोकांना तुकोबाराय खऱ्या अर्थाने स्वतःच्याच हाताने स्वतःची हत्या करणारे आत्महत्यारी म्हणून संबोधितांत. किंबहुना अशांना ते स्वतःच्या पायावर स्वतःच कुऱ्हाडि मारून घेणारे आत्मविनाशक म्हणूनच नावाजितात.
ते शेवटी देवालाच म्हणतात की, ‘हे देवा नारायणा, हे पांडुरंगा, संसारातील असे हे लोक खऱ्या अर्थाने आत्मघातकी असून वर यांच्याकडून नकळतपणे का होईना, परंतु भलीमोठी चूक घडत आहे व असते आणि ती म्हणजे दिवसेंगणिक स्वतःच्याच हाताने स्वतःचे अहित करणे ही होय आणि वर दुर्दैव म्हणजे ती त्यांना ठाऊक देखील नसणे.’
आणि अशारीतीने स्वतःच स्वतःच्या आयुष्याचा अंती विनाश करणे, ते धुळीस मिळवणे व त्याचा पार चुराडा करून टाकणे हे आणि एवढेच ते नरदेहाला येऊन साध्य करतात. तेव्हा तूच काय ते आता त्यांना सुबुद्धी दे व मार्गी लाव व सन्मार्गावर आण.”
Show Less
Comments
No comments yet. Be the first to comment!