तुकाराम महाराज म्हणतात पहा आम्ही श्रीहरि विष्णूचे दास कसे असतो ते.
ते म्हणतात आम्ही विष्णुदास नेहमी सुडके असतो, गरीब असतो आणि बाह्यरुपाने नेहमी दिनवाणी दिसतो. आम्ही अतिशय गरीब असल्यामुळे आमच्या घरी कधी चोरीमारी होत नाही.
कारण आमची सदैव असे सुडके असल्याने आमच्या घराची दारे नित्य सर्वांसाठीच खुली असतात. त्यामुळे आमच्या घरी कुत्री देखील येऊन बसतात. त्यामुळे चोर आमच्या घराजवळून देखील जात नाही.
उलट आमच्या घराजवळून जाण्यास त्यांनाच अधिक धाक वाटतो, त्यामुळे तसे करण्याचे ते धाडस सुद्धा करीत नाहीत.
थोडक्यात काय तर आम्ही जेव्हा भिक्षा मागायला जातो तेव्हा ही कुत्रीच आमची घरे राखतात.
ते म्हणतात आमचे धनधान्य लोकांच्या घरी आहे व आम्ही भिक मागून पोट भरतो. त्यामुळे धनधान्य, गुरे वासरे यांचे रक्षण करावयाचे कष्ट आम्हाला पडत नाही.
ते म्हणतात त्यामुळे आम्ही सर्वस्वी निश्चिंत झालो आहोत. आमच्या जवळील भांडवल म्हणजे शेण आणि माती आणि झडलेल्या भिंती. आमच्या कडील ठेवा म्हणजे घरासमोरील तुळशी वृंदावन.
एवढेच नव्हे तर आमची अशी झालेली अवस्था पाहून काळ देखील आम्हास भिऊन असतो. किंबहुना आमच्यावर अशी पाळी आलेली पाहून तो देखील आमच्या पासून चार हात दूर राहणेच पसंत करतो.
म्हणजेच काय तर आम्ही सदैव संसारिक छानचौकीपासून दूर असल्यामुळे आम्ही नेहमी असे फाटकेच असतो व आमच्याजवळ कुत्री देखील फिरकत नाही ही पाहून तर...
Read More
तुकाराम महाराज म्हणतात पहा आम्ही श्रीहरि विष्णूचे दास कसे असतो ते.
ते म्हणतात आम्ही विष्णुदास नेहमी सुडके असतो, गरीब असतो आणि बाह्यरुपाने नेहमी दिनवाणी दिसतो. आम्ही अतिशय गरीब असल्यामुळे आमच्या घरी कधी चोरीमारी होत नाही.
कारण आमची सदैव असे सुडके असल्याने आमच्या घराची दारे नित्य सर्वांसाठीच खुली असतात. त्यामुळे आमच्या घरी कुत्री देखील येऊन बसतात. त्यामुळे चोर आमच्या घराजवळून देखील जात नाही.
उलट आमच्या घराजवळून जाण्यास त्यांनाच अधिक धाक वाटतो, त्यामुळे तसे करण्याचे ते धाडस सुद्धा करीत नाहीत.
थोडक्यात काय तर आम्ही जेव्हा भिक्षा मागायला जातो तेव्हा ही कुत्रीच आमची घरे राखतात.
ते म्हणतात आमचे धनधान्य लोकांच्या घरी आहे व आम्ही भिक मागून पोट भरतो. त्यामुळे धनधान्य, गुरे वासरे यांचे रक्षण करावयाचे कष्ट आम्हाला पडत नाही.
ते म्हणतात त्यामुळे आम्ही सर्वस्वी निश्चिंत झालो आहोत. आमच्या जवळील भांडवल म्हणजे शेण आणि माती आणि झडलेल्या भिंती. आमच्या कडील ठेवा म्हणजे घरासमोरील तुळशी वृंदावन.
एवढेच नव्हे तर आमची अशी झालेली अवस्था पाहून काळ देखील आम्हास भिऊन असतो. किंबहुना आमच्यावर अशी पाळी आलेली पाहून तो देखील आमच्या पासून चार हात दूर राहणेच पसंत करतो.
म्हणजेच काय तर आम्ही सदैव संसारिक छानचौकीपासून दूर असल्यामुळे आम्ही नेहमी असे फाटकेच असतो व आमच्याजवळ कुत्री देखील फिरकत नाही ही पाहून तर तो देखील आम्हांला भीक घालत नाही.
तुकाराम महाराज म्हणतात आम्ही परमार्थाच्या मार्गाला लागल्यामुळे आमच्या सगळ्या इच्छा संपल्या आहेत, कशाचाही हेवा आम्हाला वाटत नाही. आणि सर्वात मोठे म्हणजे आमच्या कुटुंबाची सेवाही आम्हाला घ्यावी लागत नाही. आमच्या योगक्षेमाची संपूर्ण जबाबदारी देवच घेतो.
अभंग ३५
Show Less
Comments
No comments yet. Be the first to comment!