तुकाराम महाराज म्हणतात की जो मनुष्य, जी व्यक्ती माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा एकादशीचे व्रत करत नाही, ती पाळत नाही किंबहुना हा नेम जो चुकवतो तो ह्या उभयलोकात प्रेतासमान आहे हे जाणावे आणि त्याचे शरीर हे शव आहे हे ओळखावे. ते म्हणतात अशा व्यक्तीवर यम देखील खार खाऊन आणि रागाने दात कराकरा वाजवून क्षणोक्षणी त्याचे दिवस मोजत असतो किंबहुना ते कधी एकदा भरतात ह्याचीच वाट पाहत असतो.
ते पुढे म्हणतात तसेच ज्या घरी दारासमोर तुळशीवृंदावन नाही ते घर स्मशानगृह जाणावे व ज्याच्या कुळात कधी एकही वैष्णव जन्मला नाही त्याचे संपूर्ण कुळ ह्या भवसागरात बुडालेच म्हणून जाणा, म्हणजेच अशा कुळांतील लोकांचा उद्धार होणे कठीण आहे, म्हणजेच त्या कुळातील लोकांच्या नशिबी ह्या मृत्युलोकातच येरझाऱ्या घालणे ओघाने येते.
तसेच ते म्हणतात की ज्याच्या मुखी कधीही विठ्ठलाचे नाम येत नाही, जो कधीही 'नारायण नारायण' असे म्हणत नाही त्याचे मुख हे मुख नसून चर्मकाचे कुंड आहे हे जाणावे. (म्हणजेच त्यास मेलेल्या प्राणांच्या कातड्याचे घर जाणावे.)
तुकोबाराय शेवटी म्हणतात की एवढेच नव्हे तर जी व्यक्ती कधीही हरिकीर्तनाला जात नाही किंवा तेथे जाण्याचा विचार देखील तिच्या मनात कधी येत नाही अशा व्यक्तीचे हातपाय हे काष्टाचे/लाकडाचे आहेत हे जाणावे, त्यांचा खऱ्या अर्थाने त्यांना कधीच उपयोग झाला नाही असे मानावे....
Read More
तुकाराम महाराज म्हणतात की जो मनुष्य, जी व्यक्ती माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा एकादशीचे व्रत करत नाही, ती पाळत नाही किंबहुना हा नेम जो चुकवतो तो ह्या उभयलोकात प्रेतासमान आहे हे जाणावे आणि त्याचे शरीर हे शव आहे हे ओळखावे. ते म्हणतात अशा व्यक्तीवर यम देखील खार खाऊन आणि रागाने दात कराकरा वाजवून क्षणोक्षणी त्याचे दिवस मोजत असतो किंबहुना ते कधी एकदा भरतात ह्याचीच वाट पाहत असतो.
ते पुढे म्हणतात तसेच ज्या घरी दारासमोर तुळशीवृंदावन नाही ते घर स्मशानगृह जाणावे व ज्याच्या कुळात कधी एकही वैष्णव जन्मला नाही त्याचे संपूर्ण कुळ ह्या भवसागरात बुडालेच म्हणून जाणा, म्हणजेच अशा कुळांतील लोकांचा उद्धार होणे कठीण आहे, म्हणजेच त्या कुळातील लोकांच्या नशिबी ह्या मृत्युलोकातच येरझाऱ्या घालणे ओघाने येते.
तसेच ते म्हणतात की ज्याच्या मुखी कधीही विठ्ठलाचे नाम येत नाही, जो कधीही 'नारायण नारायण' असे म्हणत नाही त्याचे मुख हे मुख नसून चर्मकाचे कुंड आहे हे जाणावे. (म्हणजेच त्यास मेलेल्या प्राणांच्या कातड्याचे घर जाणावे.)
तुकोबाराय शेवटी म्हणतात की एवढेच नव्हे तर जी व्यक्ती कधीही हरिकीर्तनाला जात नाही किंवा तेथे जाण्याचा विचार देखील तिच्या मनात कधी येत नाही अशा व्यक्तीचे हातपाय हे काष्टाचे/लाकडाचे आहेत हे जाणावे, त्यांचा खऱ्या अर्थाने त्यांना कधीच उपयोग झाला नाही असे मानावे.
Show Less
Comments
No comments yet. Be the first to comment!