← मागील अभंग (32)
पुढील अभंग (34) →

ज्ञानाची उपरती होऊनही भक्ति कशी करावी याचे वर्म मात्र ठाऊक नसताना.

Published on: 09 Oct 2025, 04:03 AM

परिस्थिती / संदर्भ:

पहा पुढील अभंगात तुकोबा काय म्हणतात ते...
Get Started

अभंग क्रमांक: ३३


सदा तळमळ । चित्ताची हे
हळहळ ।।
त्याचे दर्शन न व्हावे । शव असता
तो जिवे ।।
कुशब्दाची घाणी । अमंगळविली
वाणी ।।
नेणे शब्दपर । तुका म्हणे
परउपकार ।।

अर्थ:
तुकाराम महाराज म्हणतात हे देवा यापुढे मला त्यालोकांचे दर्शन घडू देऊ नकोस ज्याचे चित्त नेहमी इतरांच्या वाईट विचाराने बरबटलेली असते. किंबहुना त्यांच्याप्रति वाईट विचारांनी नेहमी ज्याच्या चित्ती सदैव एक हळहळच सुरू असते.
ते म्हणतात हे देवा पांडुरंगा, अशा जिवाचे मला यापुढे दर्शन देखील घडू देऊ नकोस. कारण तो जीव नसून जीवंत असलेला एक शवच आहे असेच मला भासते.
एवढेच नव्हे तर त्यांच्या मुखी इतरांप्रति एवढे कुशब्द असतात की ते एक प्रकारे सांडपण्याचे ठिकाणच आहे असे मी समजतो. ज्यामुळे त्याची अखंड वाणीच मग अपवित्र झालेली असून त्यामुळे ती पूर्णपणे अमंगळच झालेली असते.
तुकाराम महाराज शेवटी म्हणतात अशी व्यक्ति केव्हाही परोपकार करणे जाणत नाहीत आणि इतरांना देखील तसे करू देत नाहीत.
त्यामुळे अशा मनुष्यापासून हे देवा नारायणा तू मला शक्य तितके दूरच ठेव आणि उभ्या जन्मात केव्हा त्याचे दर्शन घडेल असे देखील होऊ देऊ नकोस.
अभंग ३३ ... Read More
← मागील अभंग (32)
पुढील अभंग (34) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!