तुकाराम महाराज म्हणतात हे देवा नारायणा, हे पांडुरंगा माझी आता अशी इच्छा आहे की तू मला संतांची संगत द्यावीस, त्यांच्या संगतीत, त्यांच्या सानिध्यात राहण्याचे भाग्य माझ्या पदरी घालावेस, त्यांचा अंगसंग लाभून ते सुख माझ्या भाळी लिहावेस असे माझे अनेक दिवसांचे मनोगत आहे.
तेव्हा माझी ही एवढीशी इच्छा तू पूर्ण करशील अशी माझी आशा आहे. किंबहुना तू ती करावीस अशी माझी तुला विनंतीच आहे.
आणि ते जर अशक्य असेल तर निदान मला त्यांचा दास केलेस अथवा त्यांच्या दासांचा दास केलेस तरी त्यासही माझी काहीही हरकत नसेन. त्याने देखील मला सुखप्राप्तीच होईल.
उलट त्याने देखील आनंद वाटून माझ्या आनंदाला पारावार राहणार नाही. ते सुख देखील मी आनंदाने कबूल करेन. त्यामुळे माझे तुझ्याकडे ह्यापुढे हेच एक असे मागणे असेल.
मग तू युगानुयुगे ह्या गर्भवासात लोटलेस तरी चालेल. ते मग मी सुखाने, आनंदाने भोंगेन.
तुकोबा पुढे म्हणतात परंतु तुला तेही जर शक्य नसेल तर येथे ज्यांची वृत्ती अधम आहे, नीच आहे, आणि वर जे कर्म देखील तशीच करतात आणि आचरतात, परी ज्यांच्या मुखी तुझे नाम आहे अशांच्या सानिध्यात मला घातलेल तरी त्यासही माझी ना नसेल.
म्हणजेच ज्यांच्या मुखी सदैव एक तुझेच नाम असते, जे नित्य एक तुझ्याच नामाचा जयघोष करतात, अशांच्या सनिध्यात देखील तू मला घातलेस तरीही त्याने देखील मला तेवढाच आनंद होईल. त्यास देखील मी माझे भाग्य समजून...
Read More
तुकाराम महाराज म्हणतात हे देवा नारायणा, हे पांडुरंगा माझी आता अशी इच्छा आहे की तू मला संतांची संगत द्यावीस, त्यांच्या संगतीत, त्यांच्या सानिध्यात राहण्याचे भाग्य माझ्या पदरी घालावेस, त्यांचा अंगसंग लाभून ते सुख माझ्या भाळी लिहावेस असे माझे अनेक दिवसांचे मनोगत आहे.
तेव्हा माझी ही एवढीशी इच्छा तू पूर्ण करशील अशी माझी आशा आहे. किंबहुना तू ती करावीस अशी माझी तुला विनंतीच आहे.
आणि ते जर अशक्य असेल तर निदान मला त्यांचा दास केलेस अथवा त्यांच्या दासांचा दास केलेस तरी त्यासही माझी काहीही हरकत नसेन. त्याने देखील मला सुखप्राप्तीच होईल.
उलट त्याने देखील आनंद वाटून माझ्या आनंदाला पारावार राहणार नाही. ते सुख देखील मी आनंदाने कबूल करेन. त्यामुळे माझे तुझ्याकडे ह्यापुढे हेच एक असे मागणे असेल.
मग तू युगानुयुगे ह्या गर्भवासात लोटलेस तरी चालेल. ते मग मी सुखाने, आनंदाने भोंगेन.
तुकोबा पुढे म्हणतात परंतु तुला तेही जर शक्य नसेल तर येथे ज्यांची वृत्ती अधम आहे, नीच आहे, आणि वर जे कर्म देखील तशीच करतात आणि आचरतात, परी ज्यांच्या मुखी तुझे नाम आहे अशांच्या सानिध्यात मला घातलेल तरी त्यासही माझी ना नसेल.
म्हणजेच ज्यांच्या मुखी सदैव एक तुझेच नाम असते, जे नित्य एक तुझ्याच नामाचा जयघोष करतात, अशांच्या सनिध्यात देखील तू मला घातलेस तरीही त्याने देखील मला तेवढाच आनंद होईल. त्यास देखील मी माझे भाग्य समजून ते सुख देखील मी आनंदाने आणि कौतुकाने उपभोंगेन.
तुकोबाराय शेवटी म्हणतात कारण यापुढे मला केवळ आणि केवळ त्यांच्याच सानिध्यात राहायचे आहे, जे सदैव तुझी आठवण ठेवून आहेत व असतात. त्यांच्या देहाचे अवयव कोणतेही काम करत असले तरीही त्यांची वाचा, त्यांची वाणी मात्र तुझे नाम घेण्यातच गुंतलेली आहे वा मग्न असते.
कारण यापुढे मला केवळ आणि केवळ एक तुझीच सेवा करायची आहे. मग ती कोणत्याही मार्गाने आणि उपायाने का असेना. आणि माझा मनाने देखील हाच एक संकल्प सोडलेला आहे. त्याने जणूकाही ही प्रतिज्ञाच केलेली आहे.
त्यामुळे ह्यासाठीच मला माझे उर्वरीत आयुष्य वेचायचे आहे. त्यामुळे तू माझी ही मनोरथे पूर्ण करावीस अशी मी तुला कळकळीची विनंतीच करतो आहे असे जाण.
अभंग ३२
Show Less
Comments
No comments yet. Be the first to comment!