← मागील अभंग (313)
पुढील अभंग (315) →

अभंग क्रमांक: ३१४


जे जे काही करतो देवा । ते ते
सेवा समर्पे ।।
भेद नाही सर्वात्मना । नारायणा तुज
मज ।।
आम्ही दुजे नेणो कोणा । हेंचि मना
मन साक्ष ।।
तुका म्हणे जगन्नाथा । हे अन्यथा
नव्हे की ।।

अर्थ:
तुकाराम महाराज म्हणतात की हे देवा नारायणा मी येथे जे काही करतो, जे काही कर्म करतो ती सर्व तुझी सेवा आहे आणि ती सर्व मी तुला समर्पित करतो. म्हणजेच येथे संपूर्ण चराचरात तूच भरून राहिला आहेस हे जाणून व तसाच भाव ठेवून मी येथील प्रत्येक व्यक्तीशी आणि वस्तूशी प्रेमाने व्यवहार करतो आणि म्हणून अप्रत्यक्षरीत्या का होईना परंतु अशापद्धतीने मी तुझी सेवा करत असतो.
ते पुढे म्हणतात हे सर्वात्मना, हे नारायणा तू येथील सर्व जीवांत आत्मरूपाने वास करतो आणि माझे देखील तेच स्वरूप असल्याने आता तुझ्यात आणि माझ्यात कसलाही भेद उरलेला नाही. तसेच ते म्हणतात त्यामुळे मी आता एक तुझ्याशिवाय इतर कोणालाही जाणत नाही की ओळखत नाही आणि ह्यासाठी माझे मनच माझ्या मनाला साक्ष आहे.
तुकोबाराया शेवटी म्हणतात की हे पांडुरंगा, हे जगन्नाथा मी जे तुला हे सांगत आहे हे सत्य आहे किंबहुना ते किंचितदेखील असत्य किंवा अन्यथा नाही हे तू देखील जाणतोस. ... Read More
← मागील अभंग (313)
पुढील अभंग (315) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!