← मागील अभंग (304)
पुढील अभंग (306) →

ज्ञानाची उपरती होऊनही भक्ति कशी करावी याचे वर्म मात्र ठाऊक नसताना.

Published on: 17 Oct 2025, 06:03 AM

परिस्थिती / संदर्भ:

हे देवा मला आता अशा लोकांचे दर्शन घडू दे ज्यांचे केवळ आणि केवळ एक तुझ्यावरच मन आहे.

पहा पुढील अभंगात तुकोबा काय म्हणतात ते...
Get Started

अभंग क्रमांक: ३०५


तुजवरी ज्याचें मन । दरुषन दे
त्याचें ।।
कैसा जाती शुद्ध भाव । हात पाव
ना वृत्ती ।।
अवघियांचा करूनि मेळा । तुज डोळां
रोखिलें ।।
तुका म्हणे तुज आड । लपोनि कोड
दावीं देवा ।।

अर्थ:
तुकाराम महाराज म्हणतात हे देवा, हे नारायणा मला अशा लोकांचे दर्शन घडू दे ज्यांचे केवळ आणि केवळ एक तुझ्यावरच मन आहे. ज्यांचा केवळ आणि केवळ एक तुझ्यावरच जीव आहे, जे तुझ्यावरच माया करतात व स्वतःचे संपूर्ण आयुष्य देखील ते एक तुझ्यासाठीच खर्ची करत आहेत.
ते पुढे म्हणतात त्यांच्या ठायी देवाप्रति एवढा शुद्ध भाव असतो की त्यांच्या सर्व इंद्रियांच्या वृत्ती देखील आपापली कर्मे विसरली असून त्या सर्व एकाच ठायी वळल्या आहेत. आणि ते म्हणजे तुझे पाय वा तुझे समचरण. तुझ्या ठाईच एकवटल्या आहेत.
वढेच नव्हे तर त्यांनी आपल्या सर्व इंद्रियांचा मेळावा करून त्यांना एक तुझीच दिशा दाखवली आहे, त्यामुळे त्यांच्या ठायी त्या त्या इंद्रियांच्या कोणत्याच वृत्ती कार्यरत नसून त्यांच्या सर्वेद्रियांचा एक भला मोठा मेळावा तयार झालेला असून त्याला एक भला भला मोठा डोळा प्राप्त झालेला आहे व त्याची दृष्टी केवळ आणि केवळ एक तुझ्यावरच.
एक तुझ्या दिशेनेच रोखून पाहत असते. आणि त्यांना विचारू गेल्यास अन्य काहीही ठाऊक नसते. किंबहुना अन्य काहीही दिसेनासेच होते.
म्हणजेच काय तर त्यांची सर्वेद्रिये केवळ आणि केवळ एक तुझ्याप्रतीच असलेल्या भावाने भरलेली असून त्यांचे हातपाय देखील सदैव एक तुझ्यासाठीच वा तुझ्या प्रतीच असलेल्या कामात कार्यरत असतात.
ते म्हणतात हे देवा विठ्ठला, हे पांडुरंगा मला पुढे अशांच्याच संगतीत राहायचे असून त्यांच्या... Read More
← मागील अभंग (304)
पुढील अभंग (306) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!