तुकोबा म्हणतात ज्याप्रमाणे आमिषाच्या आसेने(इच्छेने) मासा गळ तोंडात घेतो आणि जेव्हा त्यास चिकटलेले खाद्य पदार्थ खाण्यास सुरुवात करतो, तोच त्यात लपलेला गळ त्याच्या गळ्यात अडकतो व त्यातून आपला गळ सोडवून घेण्यासाठी झटापट करू लागतो. परंतु त्याच झटापटीत त्याचा घसा फुटून मृत्यू ओढावतो.
तुकोबा म्हणतात मनुष्याचे देखील अगदी त्याचप्रमाणे होते.
या संसारतील कितीतरी गोष्टी अथवा नको त्या गोष्टी पदरी पाडून घेण्यासाठी तो नको नको त्या कृती करतो, नको त्या फंदी पडतो व अंती स्वतःच्या मृत्यूलाच आमंत्रण देतो. परंतु ते पुढे म्हणतात परंतु अशा प्रसंगी का होईना मग त्यास कृपाळू देवाची आठवण होते आणि तळमत तो कनवाळू देवाचा धावा करू लागतो. त्यातून सुटकेसाठी त्यास साकडे घालू लागतो.
तुकोबाराय म्हणतात अशारीतीने अंतकाळी का होईना, जेव्हा मनुष्याच्या मुखी देवाचे नाम येते तेव्हा मग त्याच्या सुखाला पार राहत नाही. ते म्हणतात विशेषकरून जेव्हा अंतकाळी मुखातून त्या श्रीहरिचे नाम येते तेव्हा असा मनुष्य पुढे खचितच पुढील सुखाला पात्र होतो. ...
Read More
तुकोबा म्हणतात ज्याप्रमाणे आमिषाच्या आसेने(इच्छेने) मासा गळ तोंडात घेतो आणि जेव्हा त्यास चिकटलेले खाद्य पदार्थ खाण्यास सुरुवात करतो, तोच त्यात लपलेला गळ त्याच्या गळ्यात अडकतो व त्यातून आपला गळ सोडवून घेण्यासाठी झटापट करू लागतो. परंतु त्याच झटापटीत त्याचा घसा फुटून मृत्यू ओढावतो.
तुकोबा म्हणतात मनुष्याचे देखील अगदी त्याचप्रमाणे होते.
या संसारतील कितीतरी गोष्टी अथवा नको त्या गोष्टी पदरी पाडून घेण्यासाठी तो नको नको त्या कृती करतो, नको त्या फंदी पडतो व अंती स्वतःच्या मृत्यूलाच आमंत्रण देतो. परंतु ते पुढे म्हणतात परंतु अशा प्रसंगी का होईना मग त्यास कृपाळू देवाची आठवण होते आणि तळमत तो कनवाळू देवाचा धावा करू लागतो. त्यातून सुटकेसाठी त्यास साकडे घालू लागतो.
तुकोबाराय म्हणतात अशारीतीने अंतकाळी का होईना, जेव्हा मनुष्याच्या मुखी देवाचे नाम येते तेव्हा मग त्याच्या सुखाला पार राहत नाही. ते म्हणतात विशेषकरून जेव्हा अंतकाळी मुखातून त्या श्रीहरिचे नाम येते तेव्हा असा मनुष्य पुढे खचितच पुढील सुखाला पात्र होतो.
Show Less
Comments
बहुत सारू छे !