कोणते कारण राहिले यामुळे । जे म्या तुज
बळे कष्टवावे ।।
नाही जात जीव नाही होत हानी । सहज ते
मनी आठवले ।।
नाही काही चिंता मरतो उपवासी । अथवा त्या म्हैसी
गाई व्हाव्या ।।
हे तो तुज कळो येतसे अंतरी । लापणीक वरी
साच भाव ।।
तुका म्हणे देवा नासिवंतासाठी । पायासवे तुटी
करिती तुझ्या ।।
Comments
No comments yet. Be the first to comment!