सोलीव जे सुख अतिसुखाहुनी । उभे ते
अंगणी वैष्णवांच्या ।।
वृंदावन सडे चौक रंग माळा । नाचे तो
सोहळा देखोनियां ।।
भूषण मंडित सदा सर्वकाळ । मुद्रा आणि माळ
तुळसी कंठी ।।
नाम ओघ मुखी अमृताचे सार । मस्तक पवित्र
सहित रजे ।।
तुका म्हणे मोक्ष भक्तांचिया मना । नये हे वासना
त्यांची करी ।।
Comments
No comments yet. Be the first to comment!