सोइर्यासी करी पाहुणेर बरा । कांडितो ठोंबरा संता साटीं ।।गाईंसी देखोनी बदबदा मारी । घोडएाची चाकरी गोड वाटे ।।पान फुल नेतो वेश्येसी उदंड । ब्राम्हणासी खांड देऊं नेदी ।।पर्वकाळीं धर्म न करी नासरी । वेची राजद्वारीं उदंड चि ।।कीर्त्तना जावया होतसे हींपुष्टी । खेळतो सोंकटीं रात्रंदिवस।।बाइलेच्या गोता आवडीनें पोसी । मातापितियासाठी दवडितो ।।तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी । जातो यमपुरी भोगावया ।।
Comments
No comments yet. Be the first to comment!