तुकाराम महाराज म्हणतात असे हे भोग भोगून आणि त्यापायी या संसाराचा वीट येऊन माझ्याकडून आपोआपच या संसाराचा त्याग घडून आला.
म्हणजेच येथील सर्वच गोष्टी नाशिवंत असून इतर सर्व सुखं देखील नश्वर आणि खोटी आहेत हे एकदाचे कळून चुकले की पुन्हा या संसाराची गोडी लागत नाही.
आणि एकदा का हा बोध झाला वा एकदा का या ज्ञानाची उपरती झाली की मग कोणासही हे सहज शक्य होते.
एवढेच नव्हे तर एकदा का असे घडून आले की त्यानंतर मग कितीही प्रयत्नाने देखील पुन्हा माघारी फिरता येत नाही हे देखील जाणवल्यामुळे मी आपोआपच हयातून बाहेर पडलो.
ज्याप्रमाणे एकदा का मोती शिंपल्यातून बाहेर पडला की पुन्हा त्यात अडकत नाही किंवा एकदा का ताकातून नवनीत निवडिले वा बाहेर पडले की पुन्हा ते त्यात मिसळू शकत नाही अगदी त्याप्रमाणेच.
त्यामुळे आता पुन्हा माघारी फिरणे शक्यच नाही हे उमगल्यामुळे यातून बाहेर पडणेच शहाणपणाचे आहे किंबहुना हे माझे कर्तव्यच आहे हे ओळखून मी या संसारातून बाहेर पडलो. ...
Read More
तुकाराम महाराज म्हणतात असे हे भोग भोगून आणि त्यापायी या संसाराचा वीट येऊन माझ्याकडून आपोआपच या संसाराचा त्याग घडून आला.
म्हणजेच येथील सर्वच गोष्टी नाशिवंत असून इतर सर्व सुखं देखील नश्वर आणि खोटी आहेत हे एकदाचे कळून चुकले की पुन्हा या संसाराची गोडी लागत नाही.
आणि एकदा का हा बोध झाला वा एकदा का या ज्ञानाची उपरती झाली की मग कोणासही हे सहज शक्य होते.
एवढेच नव्हे तर एकदा का असे घडून आले की त्यानंतर मग कितीही प्रयत्नाने देखील पुन्हा माघारी फिरता येत नाही हे देखील जाणवल्यामुळे मी आपोआपच हयातून बाहेर पडलो.
ज्याप्रमाणे एकदा का मोती शिंपल्यातून बाहेर पडला की पुन्हा त्यात अडकत नाही किंवा एकदा का ताकातून नवनीत निवडिले वा बाहेर पडले की पुन्हा ते त्यात मिसळू शकत नाही अगदी त्याप्रमाणेच.
त्यामुळे आता पुन्हा माघारी फिरणे शक्यच नाही हे उमगल्यामुळे यातून बाहेर पडणेच शहाणपणाचे आहे किंबहुना हे माझे कर्तव्यच आहे हे ओळखून मी या संसारातून बाहेर पडलो.
Show Less
Comments
No comments yet. Be the first to comment!