विठ्ठला रे तू उदारांचा राव । विठ्ठला तू जीव
या जगाचा ।।
विठ्ठला रे तू उदाराची रासी । विठ्ठला तुजपाशी
सकळ सिद्धी ।।
विठ्ठला रे तुझे नाम बहु गोड । विठ्ठला तू
कोड पुरविसी ।।
विठ्ठला रे तुझे श्रीमुख चांगले । विठ्ठला लागले
ध्यान मनी ।।
विठ्ठला रे वाचे बोला बहू रस । विठ्ठला रे सोस
घेतला जीवे ।।
विठ्ठला रे शोक करितसे तुका । विठ्ठला तू ये
का झडकरी ।।
Comments
No comments yet. Be the first to comment!