आशाबद्ध वक्ता । धाक श्रोतियाच्या
चित्ता ।।
गातो तेही नाही ठावे । तोंड वासी
काही द्यावे ।।
झाले लोभाचे मांजर । पोट भरे
दारोदार ।।
वाया गेले ते भजन । उभयता लोभी
मन ।।
बहिरे मुके एके ठायी । तैसे झाले
त्या दोही ।।
माप आणि गोणी । तुका म्हणे
रिती दोन्ही ।।
Comments
No comments yet. Be the first to comment!