तुकाराम महाराज म्हणतात हे देवा नारायणा, हे पांडुरंगा निदान आता तरी मला सहाय्य करा, आणि माझ्या इंद्रियांना आवर घालून माझ्या दुःखाची खंडणा करा. माझ्या या सैराट सुटलेल्या मनावर नियंत्रण प्रस्थापित करून निदान आता तरी माझ्या दुःखाचे निवारण करा.
म्हणजेच काय तर माझ्या या सैराट सुटलेल्या मनामुळे माझ्यावर कोसळू पाहत असलेल्या या भावी संकटापासून माझी मुक्तता करा. त्यापासून एकदाची माझी सुटका करून माझे संपूर्ण संरक्षण करा.
एवढेच नव्हे तर, अशा या माझ्या मनात तुम्ही कायमचे वस्तीलाच या. तेथे मुक्कामच ठोका. आणि तेथे वस्ती करून माझी सर्वेंद्रिये तुमच्या पायाशी बांधूनच टाका. व त्यांच्या सर्व वृत्ती तुम्ही तुमच्या चरणांशी राखून ठेवा.
एवढेच नव्हे तर, पुढे लाडाने-कोडाने माझे पालन-पोषण करा. प्रेमाने, लळेने मला पाळून माझा सांभाळ करा आणि माझ्या भक्तीचे फळ शक्य तितक्या लवकर माझ्या ओंजळीत टाका. माझ्या पदरी घाला.
म्हणजेच निदान आता तरी माझे मानस फळाला येईल असे काहीतरी करा. आणि तसे करून तुम्ही खरंच दिनांचे दुख दूर करता, दिन-दुबळ्यांचा सीण हरता, त्यांचा संसाराचा थकवा घालवता हे वचन सत्य करून दाखवा.
आणि असे करून मला देखील त्वरेने त्याची प्रचिती द्या. म्हणजेच काय तर लवकरात लवकर माझ्यावर देखील तुम्ही तुमची मेहेरजनजर फिरवून, तुमची कृपादृष्टी फेरून, तुमच्या कृपेची अनुभूति घेऊ द्या.
म्हणजेच काय तर, सर्वदूर...
Read More

म्हणजेच काय तर, सर्वदूर तुमची जी ख्याती पसरली आहे, तुम्हाला भक्तांनी जी ब्रीदे दिली आहेत, जी तुम्ही देखील मोठ्या दिमाखात वागवता, ती मिरवता, मला देखील या निमित्ताने त्यांचा अनुभव घेऊ द्या.
अभंग २९२
Show Less
Comments
No comments yet. Be the first to comment!