← मागील अभंग (27)
पुढील अभंग (29) →

अभंग क्रमांक: २८


सकळ चिंतामणी शरीर । जरी जाय अहंकार समूळ आशा ।निंदा हिंसा नाही कपट देहबुद्धी । निर्मल स्फटिक
जैसा ।।
मोक्षाचे तीर्थ नलगे वाराणसी । येती तयापाशी अवघी जने ।तीर्थासी तीर्थ झाला तोचि एक । मोक्ष तेणे
दर्शने ।।
मन शुद्ध तया काय करिसी माळा । मंडित सकळा भूषणांसी ।हरीच्या गुणे गर्जताती सदा । आनंद तया
मानसी ।।
तन मन धन दिले पुरुषोत्तमा । आशा नाही कवणाची ।तुका म्हणे तो परिसाहूनि आगळा । काय महिमा वर्णू त्याची।।

अर्थ:
त्याग का करावा? किंवा कधी घडून येतो?... Read More
← मागील अभंग (27)
पुढील अभंग (29) →
Follow (0)
Subscribe (0)
Views (0)
कृपया करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. त्या आमच्यासाठी बहुमूल्य आहेत.
Comments

No comments yet. Be the first to comment!