भोग भोगणे आले असता काय करावे?
Published on: 23 Aug 2025, 06:51 AM
परिस्थिती / संदर्भ:
कारण ते म्हणतात की ह्या संसारात शांती सारखे किंवा शांतीहून अन्य कोणतेही खरे सुख नाही किंबहुना शांतीखेरीज येथे सर्वकाही दुःखच दुःख आहे आणि तेच मनुष्याला पैलतीर गाठण्यास देखील मदत करते आणि म्हणून मनुष्याने संसारात नेहमी शांत आणि समाधान चित्ताने राहावे मात्र त्याउलट जर तो कामक्रोधाने भरेल तर त्याच्यात विकारांच्या व्याधी संचार करू लागतील आणि शारीरिक दुःखाने तो अधिकच पिडीत होईल.
पहा पुढील अभंगात तुकोबा काय म्हणतात ते...
Get Started
अभंग क्रमांक: २६८
शांतीपरते नाही सुख । येर अवघेची
दुख ।।
म्हणउनी शांती धरा । उतराल पैल
तीरा ।।
खवळलिया कामक्रोधी । अंगी भरती
आधी व्याधी ।।
तुका म्हणे त्रिविध ताप । जाती मग
आपोआप ।।
अर्थ:
तुकाराम महाराज म्हणतात की ह्या संसारात एका शांतीशिवाय दुसरे कोणतेच खरे सुख नाही, दुसरे कोणतेच खरे समाधान नाही किंबहुना त्याच्या व्यतिरिक्त बाकी सर्वकाही येथे दुःखरूप आहे, म्हणजेच ज्या गोष्टी चित्ताला शांती आणि समाधान घेऊन येत नाहीत किंवा देऊ शकत नाहीत त्या सर्व दुःखदायक असतात आणि म्हणूनच मनुष्याने शांतीची कास कधीही सोडू नये. कारण शेवटी त्या एका मार्गानेच मनुष्याचा खरा उद्धार होतो आणि तो पैलतीर देखील गाठतो. ते पुढे म्हणतात परंतु मनुष्याने शांतीला दूर लोटून जर कामक्रोधांचा मार्ग अवलंबिला किंवा तो जर त्याच्या अधीन गेला तर कामक्रोधानें त्याचे चित्त खवळलेच म्हणून समजावे आणि एकदा का चित्तात कामक्रोधांना थारा मिळाला की मग त्यापासून देहात व्याधींना आमंत्रण गेलेच म्हणून समजावे. कारण मनुष्याच्या चित्तात असलेले विकार हेच व्याधींना खरे निमंत्रण असते तुकोबाराय शेवटी म्हणतात अशाप्रकारे शांतीची साथ सदैव धरून ठेवल्यास मनुष्याची ठायी असलेल्या त्रिगुणांपासून सुटका होऊन त्यापासून होणारा त्रिविध तापदेखील मग आपोआप निवारीला जातो. ...
Read More
तुकाराम महाराज म्हणतात की ह्या संसारात एका शांतीशिवाय दुसरे कोणतेच खरे सुख नाही, दुसरे कोणतेच खरे समाधान नाही किंबहुना त्याच्या व्यतिरिक्त बाकी सर्वकाही येथे दुःखरूप आहे, म्हणजेच ज्या गोष्टी चित्ताला शांती आणि समाधान घेऊन येत नाहीत किंवा देऊ शकत नाहीत त्या सर्व दुःखदायक असतात आणि म्हणूनच मनुष्याने शांतीची कास कधीही सोडू नये. कारण शेवटी त्या एका मार्गानेच मनुष्याचा खरा उद्धार होतो आणि तो पैलतीर देखील गाठतो. ते पुढे म्हणतात परंतु मनुष्याने शांतीला दूर लोटून जर कामक्रोधांचा मार्ग अवलंबिला किंवा तो जर त्याच्या अधीन गेला तर कामक्रोधानें त्याचे चित्त खवळलेच म्हणून समजावे आणि एकदा का चित्तात कामक्रोधांना थारा मिळाला की मग त्यापासून देहात व्याधींना आमंत्रण गेलेच म्हणून समजावे. कारण मनुष्याच्या चित्तात असलेले विकार हेच व्याधींना खरे निमंत्रण असते तुकोबाराय शेवटी म्हणतात अशाप्रकारे शांतीची साथ सदैव धरून ठेवल्यास मनुष्याची ठायी असलेल्या त्रिगुणांपासून सुटका होऊन त्यापासून होणारा त्रिविध तापदेखील मग आपोआप निवारीला जातो.
Show Less
Comments
No comments yet. Be the first to comment!