अभंग क्रमांक: २६३
साधने तरी हीच दोन्ही । जरी कोणी
साधील ।।
परद्रव्य परनारी । यांचा धरी
विटाळ ।।
भाग्ये घरा येती । संपत्ती त्या
सकळा ।।
तुका म्हणे ते शरीर । गृह भांडार
देवाचे ।।
अर्थ:
परद्रव्य/परनारी: स्वहितासाठी: सुखी संसारासाठी: तुम्ही दैनंदिन जीवनात निदान हे दोन नियम तरी पाळलेत तरीही तुमच्या घरी भाग्ये चालत येतील आणि ते शरीर देवाचे गृह-भांडारच होऊन जाईल...
Read More
परद्रव्य/परनारी: स्वहितासाठी: सुखी संसारासाठी: तुम्ही दैनंदिन जीवनात निदान हे दोन नियम तरी पाळलेत तरीही तुमच्या घरी भाग्ये चालत येतील आणि ते शरीर देवाचे गृह-भांडारच होऊन जाईल
Show Less
Comments
No comments yet. Be the first to comment!