Published on: 01 Aug 2026, 05:54 PM
परिस्थिती / संदर्भ:
जरी माझी कोणी कापितील मान । तरी नको आन
वदों जिव्हे ।।
सकळां इंद्रियां हे माझी विनंती । नका होऊं
परतीं पांडुरंगा ।।
आणिकांची मात नाइकावी कानीं । आणीक नयनीं
न पाहावें ।।
चित्ता तुवां पायीं रहावें अखंडित । होउनी निश्चित
एकविध ।।
चला पाय हात हें चि काम करा । माझ्या नमस्कारा
विठोबाच्या ।।
तुका म्हणे तुम्हां भय काय करी । आमुचा कैवारी
नारायण ।।
Comments
No comments yet. Be the first to comment!