नव्हे सुख मज न लगे हा मान । न राहे हे
जन काय करू ।।
देह उपचारे पोळतसे अंग । विषातुल्य चांग
मिष्टान्न ते ।।
नाइकवे स्तुति वर्णिता थोरीव । होतो माझा
जीव कासावीस ।।
तुज पावे ऐसी सांग माझी कळा । नको मृगजळा
गोवू मज ।।
तुका म्हणे आता करी माझे हित । काढावे जळत
आगीतूनि ।।
Comments
No comments yet. Be the first to comment!