वर्णू महिमा ऐसी नाही मज वाचा । न बोलवे साचा
पार तुझा ।।
ठायींची हे काया ठेविली चरणी । आता ओवाळुनि
काय सांडू ।।
नाही भाव ऐसा करू तुझी सेवा । जीव वाहू देवा
तोही तुझा ।।
मज माझे काही न दिसे पाहता । ते तुज
अनंता समर्पावे ।।
तुका म्हणे आता नाही मज थार । तुझे उपकार
फेडावया ।।
Comments
No comments yet. Be the first to comment!