तुकोबा पुढे म्हणताहेत हे देवा पांडुरंगा, हे हृदयस्था तुला अजूनही माझा कळवळा येत नाहीये का? माझ्या हृदयाच्या एवढ्या जवळ असूनही तुला अजूनही माझी दया येत नाहीये का?
ते म्हणतात हे नारायणा, हे निष्ठुर निर्गुणा, तू किती रे कठीण मनाचा आणि कठोर अंतकरणाचा आहेस. मी तुझ्या समोर असून एवढा शोक करत आहे, नव्हे माझा कंठस्फोटच होत आहे, ते देखील तुला कळत नाहीये का? ते देखील तुला जाणवत नाहीये का?
ते पुढे म्हणतात माझे हे चित्त अजूनही का विश्रांती पावत नाही, ते अजूनही धीराने का घेत नाही, ते अजूनही शांत का होत नाही व एकेठायी स्वस्थ का बसत नाही हेच विचारण्यासाठी पुनः एकवार तुझ्या दाराशी आलो आहे.
किंबहुना तो माझ्यासाठी एक यक्षप्रश्नच झाला असून ते माझ्यासाठी आता एक भले मोठे न सुटणारे कोडेच झाले आहे. नव्हे, माझ्यासाठी ते एक अवघड जागेचे दुखणेच झाले आहे.
आणि दुसरीकडे माझी इतर इंद्रिये देखील त्यात भर घालत आहेत. ती देखील आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत. ती देखील काही कमी नसून त्यांची देखील गती अजूनही काहीकेल्या कुंठित होत नाही.
आणि ह्यावर नेमका आता कोणता उपाय योजावा हे माझ्या बुद्धीला ठाऊक नसून वर तू देखील मला विन्मुख झाल्यासारखाच वागत आहेस. आणि माझ्याकडे पाठच फिरवून बसला आहेस.
कारण माझ्या समस्येवर तू काहीच तोडगा काढत नाहीयेस किंवा त्यावर काहीही समाधान-कारक उपाय सुचवत नाहीयेस. त्यामुळे माझीच मला आता दया ये...
Read More
तुकोबा पुढे म्हणताहेत हे देवा पांडुरंगा, हे हृदयस्था तुला अजूनही माझा कळवळा येत नाहीये का? माझ्या हृदयाच्या एवढ्या जवळ असूनही तुला अजूनही माझी दया येत नाहीये का?
ते म्हणतात हे नारायणा, हे निष्ठुर निर्गुणा, तू किती रे कठीण मनाचा आणि कठोर अंतकरणाचा आहेस. मी तुझ्या समोर असून एवढा शोक करत आहे, नव्हे माझा कंठस्फोटच होत आहे, ते देखील तुला कळत नाहीये का? ते देखील तुला जाणवत नाहीये का?
ते पुढे म्हणतात माझे हे चित्त अजूनही का विश्रांती पावत नाही, ते अजूनही धीराने का घेत नाही, ते अजूनही शांत का होत नाही व एकेठायी स्वस्थ का बसत नाही हेच विचारण्यासाठी पुनः एकवार तुझ्या दाराशी आलो आहे.
किंबहुना तो माझ्यासाठी एक यक्षप्रश्नच झाला असून ते माझ्यासाठी आता एक भले मोठे न सुटणारे कोडेच झाले आहे. नव्हे, माझ्यासाठी ते एक अवघड जागेचे दुखणेच झाले आहे.
आणि दुसरीकडे माझी इतर इंद्रिये देखील त्यात भर घालत आहेत. ती देखील आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत. ती देखील काही कमी नसून त्यांची देखील गती अजूनही काहीकेल्या कुंठित होत नाही.
आणि ह्यावर नेमका आता कोणता उपाय योजावा हे माझ्या बुद्धीला ठाऊक नसून वर तू देखील मला विन्मुख झाल्यासारखाच वागत आहेस. आणि माझ्याकडे पाठच फिरवून बसला आहेस.
कारण माझ्या समस्येवर तू काहीच तोडगा काढत नाहीयेस किंवा त्यावर काहीही समाधान-कारक उपाय सुचवत नाहीयेस. त्यामुळे माझीच मला आता दया येऊ लागली आहे.
ज्यामुळे मी आता खरंच केविलवाणा झालो असून दीनवाणाच दिसू लागलो आहे. परंतु तरीदेखील तुला माझी किंचितही कवण येत नाही हे पाहून मला आता राहून राहून आश्चर्य वाटू लागले आहे.
किंबहुना तुम्हीदेखील मला सहाय्य करत नाही हे पाहून माझे खरंच काही चुकले आहे का, माझ्याकडून काही अपराध तर घडला नाही ना, ज्यामुळे तुम्ही माझ्यावर असा कोप धरून आहात, असे मला आता वाटू लागले आहे.
किंवा माझे पाप अजूनही संपूर्णपणे सरले नाही का अशी शंका देखील माझ्या मनी आता डोकावू लागली आहे. त्यामुळे मी आता खऱ्या अर्थाने संभ्रमात पडू लागलो आहे.
तेव्हा निदान ह्याची तरी उत्तरे मला देऊन तुम्ही मला शांत करावे, असे माझे तुम्हांला सांगणेच आहे. म्हणजे किमान तेवढे तरी सांगून तुम्ही मला शमवावे, निमवावे अशी मी तुम्हांला पुनः एकवार विनवणीच करतो आहे.
अभंग २४३
Show Less
Comments
No comments yet. Be the first to comment!